भाषा हे साहित्याचे नव्हे, तर अभिव्यक्तीचे माध्यम
By admin | Published: February 13, 2017 03:15 AM2017-02-13T03:15:06+5:302017-02-13T03:15:06+5:30
भाषा हे साहित्याचे नव्हे, तर अभिव्यक्तीचे माध्यम आहे; त्यामुळे भाषा घडायला हवी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.
बेळगाव : भाषा हे साहित्याचे नव्हे, तर अभिव्यक्तीचे माध्यम आहे; त्यामुळे भाषा घडायला हवी, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी रविवारी व्यक्त केले.
येळ्ळूर (जि.बेळगाव) येथील ग्रामीण मराठी साहित्य संघ आयोजित १२ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. हैदराबादचे आयपीएस अधिकारी महेश भागवत यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. बेळगावच्या महापौर सरिता पाटील प्रमुख पाहुण्या होत्या.
जोशी म्हणाले, राजद्रोहाचे कलम घटनेतून हद्दपार व्हायला हवे. आज विकासाची व्याख्या बदलत आहे. अधिग्रहित जमिनी बांधकाम व्यावसायिकांच्या घशात जात आहेत. त्यांना विरोध करणारे मेधा पाटकरांसारखे कार्यकर्ते राजद्रोहाच्या कलमात अडकत असून, हे कलम हटविण्यासाठी मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. येळ्ळूर हे संघर्षाचे गाव आहे. आजवर तुम्ही तीन पिढ्यांचा जो संघर्ष करीत आहात, तो अवर्णनीय आहे. आम्ही तुमचे आदर्श नव्हे, तर तुम्ही आमचे आदर्श आहात. (प्रतिनिधी)