कोकणातील सर्वात मोठा प्रकल्प, साखरी नाटे बंदरात ११० कोटी रुपयांची जेटी
By admin | Published: February 10, 2016 04:28 PM2016-02-10T16:28:32+5:302016-02-10T17:31:28+5:30
जैतापूरलगतच्या साखरी नाटे बंदरात ११० कोटी रुपयांचा जेटी प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. हा कोकणातील सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे नाटे गावीतील मच्छिमारी करणारे आणि ग्रामस्त आनंदात आहेत
Next
>सचिन नारकर
जैतापूर, दि. १० - जैतापूरलगत असलेल्या राजापूरच्या साखरी नाटे बंदरात ११० कोटी रुपयांचा जेटी प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. हा कोकणातील सर्वात मोठा प्रकल्प असल्यामुळे नाटे गावीतील मच्छिमारी करणारे आणि ग्रामस्त आनंदात आहेत. कोकणात साखरी नाटे बंदर हे मच्छिमारी बंदर म्हणून प्रसिद्ध आहे. रत्नागिरी, सिंधूदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यातील मच्छिमारी करणाऱ्यास या जेटी प्रकल्पामुळे फायदा होणार आहे.
जेटी प्रकल्पाची सर्व काम महाराष्ट्र मेरीटाईज बोर्डाकडून मस्य खात्याकडे वर्ग करण्यात आले आहे. त्यानुसार मस्यखात्यांनी सर्व प्रक्रिया पुर्ण केली आहे. साखरी नाटे हा कोकणातील सर्वात मोठा प्रकल्प असून यावर सगळ्या सुविधा असणार आहेत. हा प्रकल्प फेज १ , फेज २ यु आकारात डिजाईन केला आहे. तसेच पेट्रोल. डिजेल पंप, दोन कँटीग, पिण्याचे मुबलक पाणी, बर्फ फॅक्टरीसाऱ्या अनेक सुविधा उपल्बध असणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सध्या साखरी नाटे बंदरात यांत्रिकी नौका ४०० तर बिगर यांत्रिकी नौकांचे प्रमाण देखील खुप आहे. तसेच प्रत्येक वर्षी २० -२५ नौकांची नोंदणी होत आहे. २००४ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी साखरी नाटे जेटीच्या नवीन बांधकामाच्या शुभारंभाचा नारळ फोडला होता. पण अपुऱ्या निधीमुळे जेटीचे काम सुरुच झाले नव्हते.
या जेटी मुळे मालवण, कातळी, इंगवाडी, देवगड बंदरावरील बोटी इथे मासे विकण्यासाठी किंवा इतर सुविधासाठी या बंदरावर येऊ शकतात. तर या प्रकल्पामुळे देवगड, मालवण, या भागातील मच्छिमारांसाठी मुंबई मार्केट जवल होणार आहे.