कोकणात उभारणार देशातली सर्वात बडी रिफायनरी - मुख्यमंत्री फडणवीस
By admin | Published: January 25, 2016 01:13 PM2016-01-25T13:13:19+5:302016-01-25T13:13:19+5:30
कोकणामध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातील सगळ्यात मोठी इंटिग्रेटेड रिफायनरी उभारण्यात येणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ - कोकणामध्ये एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशातील सगळ्यात मोठी इंटिग्रेटेड रिफायनरी उभारण्यात येणार असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून पेट्रोलियम मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे आभार मानले आहेत. आज प्रधान यांच्यासोबतची बैठक अत्यंत फलदायी झाली असल्याचे आणि एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या माध्यमातून एकूण मिळून एक लाख रोजगार निर्माण होणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
Thankful to Hon @dpradhanbjp ji for productive meeting on setting up of Integrated Oil Refinery inKonkan,Maharashtra pic.twitter.com/9hEc7AFMs4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 25, 2016
कोकणामध्ये हा देशातला सगळ्यात मोठा तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यासाठी इंडियन ऑइल, हिंदुस्थान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या तिनही बड्या तेलकंपन्या एकत्र येणार आहेत.
भारताची सध्याची पेट्रोलजन्य उत्पादनांची गरज १८० दशलक्ष टनांच्या आसपास आहे, जी २०४०पर्यंत वाढून ५५० दशलक्ष होण्याची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने भारतातील तेलशुद्धीकरण प्रकल्पांची वाढ वेगाने होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र सरकारने याकामी पुढाकार घेतला असून राज्य सरकार, केंद्र सरकार व तिनही पेट्रोलियम कंपन्या एकत्रितपणे काम करणार आहेत.
More than ₹1 lakh crore investment will generate an employment of 1,00,000;will give boost to down stream industries pic.twitter.com/TRM0oJkeyi
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 25, 2016
अर्थात, या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण ही सर्वात मोठी बिकट समस्या आहे. याआधीही हिंदुस्थान पेट्रोलियमने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रिफायनरीसाठी जमीन अधिग्रहणाचा अयशस्वी प्रयत्न केला आणि अखेर कोकणाचा नाद सोडून राजस्थानातील बारमेर येथे रिफायनरी उभारली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विटरच्या माध्यमातून ही शुभवार्ता दिली असली तरी जमीन अधिग्रहणाबाबत माहिती दिलेली नाही.