लासलगावला कांदा ४५ रुपये किलो !
By admin | Published: September 1, 2015 02:00 AM2015-09-01T02:00:30+5:302015-09-01T02:00:30+5:30
केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातमूल्यात केलेली वाढ तसेच परदेशातून आयात सुरू झाल्याने येथील घाऊक बाजारपेठेत कांद्याची सातत्याने घसरण सुरू आहे
लासलगाव : केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातमूल्यात केलेली वाढ तसेच परदेशातून आयात सुरू झाल्याने येथील घाऊक बाजारपेठेत कांद्याची सातत्याने घसरण सुरू आहे. सोमवारी घाऊक बाजारात कांद्याला क्विंटलमागे सरासरी ४,५०० रुपये भाव मिळाला.
सोमवारी येथील बाजारपेठेत कांदा भावात ३८० रुपयांची घसरण झाली. इजिप्त व अफगाणिस्तानमधून आयात सुरू झाल्याने भाववाढीवर निर्बंध आले आहेत. शनिवारी कांद्याला क्विंटलमागे ५,५८१ रुपये भाव मिळाले होते; तर गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांनी ६,३२६ रुपये क्विंटलने कांद्याची खरेदी केली होती.
सोमवारी कांद्याला ५,२०१ रुपये कमाल भाव जाहीर झाला. लासलगाव बाजारपेठेत ९५४ क्विंटल मालाची आवक झाली.
किमान भाव ३,१०० तर सरासरी दर ४,५०० रुपये होते. शनिवारी कांद्याला ५,५८१ रुपये भाव जाहीर झाला होता. मुंबई, पुण्यासह महानगरांमध्ये किरकोळ बाजारात अजूनही कांद्याला किलोमागे ८० रुपये मोजावे लागत आहेत. (वार्ताहर)