लासलगाव - १९८५ नंतर प्रथमच गोणीसह कांदा लिलाव
By admin | Published: July 26, 2016 04:56 PM2016-07-26T16:56:14+5:302016-07-26T16:56:14+5:30
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २६ :- लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १९८५ नंतर व्यापारीवर्गाच्या मागणीमुळे प्रथमच गोणीसह कांदा लिलाव मंगळवार पासून सुरु झाला आहे . यावेळी बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या हस्ते कांदा गोण्यांचे पूजन करण्यात आले .यावेळी सदस्य सचिन ब्रम्हेचा ,रमेश पालवे, सचिव बी.वाय.होळकर , व्यापारी ओमप्रकाश राका, नितीन जैन ,रमेश शिंदे , वाल्मीकराव जाधव , राठी ,राहुल बरडिया ,संतोष माठा ,उपस्थित होते . बाजार समितीत शेतक-यांनी वाहनातून कांदा १७८६ गोणीत आणला होता .त्या कांद्याला जास्तीजास्त ९५२ रुपये ,सरासरी ८४४ रुपये तर कमीतकमी ४०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला .
रविवारी मनमाड येथे झालेल्या बैठकीत व्यापा-यांनी शेतक-यांकडून अडत न घेता इतर जिल्ह्यातून कांदा गोणीत लिलावासाठी येत असल्याने नाशिक जिल्ह्यातून हि शेतक-यांनी कांदा हा गोणीत आणावा हा निर्णय घेतल्यानंतर मंगलवारी लासलगाव कृषी उत्पन्न समितीत गोणीत कांदा आणत १७ दिवसानंतर लिलाव पूर्ववत सुरु झाला आहे .
दोन आठवड्यांपासून बाजार समितीत कांद्याचे लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला होता . दरम्यान कांदा व्यापा-यांनी सुरु केलेला संप मागे घेतल्याने शेतक-यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी गोणी पद्धतीने कांदा लिलाव सुरु करण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्याने शेतक-यांची घोर निराशा झाली .यामुळे शेतक-यांचा खर्च अडीचपट वाढणार आहे .पूर्वीच्याच लिलाव पद्धतीने व्यापा-यांनी कांदा लिलाव सुरु करावा अशी मागणी बाजार समितीत शेतकरी करताना दिसत होते .
यापुढे अडत हि कांदा खरेदीदारांकडून वसूल केली जाणार असली तरी व्यापा-यांनी गोनी पद्धतीने कांदा लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याने कांदा निवड करून गोणीत भरून आणावा लागणार असल्याने मजुरी व नवीन कांदा बारदान गोनी विकत घ्यावी लागणार आहे यामुळे शेतक-यांना क्विंटलमागे ९० ते १०० रुपये अतिरिक्त खर्च येणार असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे .
व्यापा-यांना होणार हा फायदा ......
प्रतवारी केलेला कांदा मिळणार . मजूरवर्ग लागणार नाही . कांद्यासाठी गोण्या लागणार नाही . बाजार समितीतून कांद्याचा लिलाव झाल्याबरोबर गाडी भरून पाठविल्यास होणार आर्थिक फायदा .
हे होणार शेतकरीवर्गाचे नुकसान .......
कांदा प्रतवारीसाठी मजुरी वर खर्च कांद्यासाठी गोणी वर खर्च.
शासनाने हस्तक्षेप करत गोणी पद्धत बंद करावी ........
जयदत्त होळकर शेतक-यांनी कांदा गोणीत भरून आणल्यास त्याचा लिलाव करण्यात येईल व शेतक-यांकडून अडत घेतली जाणार नाही अशी व्यापा-यांनी भूमिका घेतली असल्याने यात शासनाने हस्तक्षेप करत पूर्वीप्रमाणे खुल्या पद्धतीने लिलाव सुरु करावे .