‘टायगर’ने घेतला अखेरचा श्वास

By admin | Published: July 24, 2016 03:33 AM2016-07-24T03:33:54+5:302016-07-24T03:33:54+5:30

मुंबई वरील २६/११ चदहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मध्ये तब्बल आठ दिवस ड्युटी बजावलेल टायगर या श्वानाचे आजदुपारी विरारजवळील फिजा फार्म हाऊसमध्ये निधन झाले.

The last breath took place by 'Tiger' | ‘टायगर’ने घेतला अखेरचा श्वास

‘टायगर’ने घेतला अखेरचा श्वास

Next

वसई : मुंबई वरील २६/११ चदहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेल मध्ये तब्बल आठ दिवस ड्युटी बजावलेल टायगर या श्वानाचे आजदुपारी विरारजवळील फिजा फार्म हाऊसमध्ये निधन झाले.त्याच पार्थिवावर श्वान पथकातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
२००४ मध्ये गोरेगाव श्वानपथकात टायगर दाखल झाला होता. त्यानंतर २०१५ पर्यंत त्याने पोलिसांसाठी काम केले. मे २०१५ ला निवृत्त झाल्यानंतर टायगरला विरार येथील फिजा शहा यांच्या फिजा फार्ममध्ये ठेवण्यात आले होते. आजदुपारी टायगरने याठिकाणी शेवटचा श्वास घेतला.
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्यात टायगरने महत्वाची कामगिरी केली होती. आठ दिवस ताज हॉटेलबाहेर ड्युटीवर असलेल्या टागरने आरडीएक्स शोधून देण्यात पोलिसांना मदत केली होती. यावेळी पोलिसांच्या शोध मोहिमेत टायगरने मोलाची कामगिरी केली होती. त्याआधी टायगरने२००६ साली कांदीवली येथील एका झोपडपट्टीतून जिवंत गावठी बॉम्ब शोधून काढला होता. त्यानंतर २००८ साली पवई हिरानंदानी हॉस्पीटलजवळ जिवंत बॉम्ब शोधण्यात पोलिसांना मदत केली होती. (प्रतिनिधी)


टायगर अतिशय शांत आणि मनमिळावू होता. बॉलने खेळायला त्याला खूप आवडाचे, असे पोलीस उपनिरीक्षक इम्रान पटेल यांनी सांगितले.
फिजा फार्ममध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात मोलाची कामगिरी केलेल्या सुलतान या श्वानालाही ठेवण्यात आले होते.त्याचेही काही महिन्यांपूर्वीच याठिकाणी निधन झाले होते. त्यानंतर टायगरचे निधन झाले. देशाची ेगरज असलेल्या श्वानांना तीन महिन्यांपासून सेवेत दाखल केले जाते. त्यानंतर त्यांना १० वर्षे सेवेत ठेवले जाते. यादरम्यान त्यांना सततकाम असल्याने ते थकून जातात. म्हणूनश्वानांना सहा महिन्यातून किमान दहा दिवससुट्टी देऊन दुसऱ्या जगात खुले आम फिरण्यासाठी सोडले पाहिजे. त्यामुळे ते लवकर थकणार नाहीत आणि त्यांचे आयुष्यमानही उंचावेल, असे फार्र्मच्या फिजा शहा यांनी सांगितले.

सुलतान, मॅक्सनंतर टायरगरनेही घेतला निरोप
मुंबई : शहराच्या सुरक्षेसाठी अहोरात्र मुंबई पोलिसांना साथ देण्याचे काम पोलीस दलाचे श्वानपथक करत असतात. गेल्या काही दिवसात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात महत्त्वाची कामगिरी बजाविणाऱ्या सुलतान, मॅक्स नंतर टायगरनेही जगाचा निरोप घेतल्याने मुंबई पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
मुंबई पोलिसांनी बॉम्बशोधक पथकांमध्ये टायगरच्या धाडसी कामगिरीमुळे तो सर्वांच्या जवळ होता. गोरेगाव येथील बॉम्बशोधक पथकांत टायगर, सुलतान, मॅक्स आणि मर्सी या श्वानांचा एकच दबदबा होता. २६/११ चा हल्ला झाला त्यावेळी बॉम्बनाशक पथकाने या श्वानांसह घटनास्थळी धाव घेतली.
अशा वेळी या श्वानांच्या मदतीने संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यास मोलाची मदत झाली. त्याचप्रमाणे कसाबसह त्याचे साथीदार ज्या ठिकाणी घुसले त्यांची ठिकाणे या श्वानांनी शोधून काढली होती. त्यानंतर या श्वानांची वयोमर्यादा संपल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आले होते.

Web Title: The last breath took place by 'Tiger'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.