अभियांत्रिकीसाठी राज्याची शेवटची सीईटी
By admin | Published: February 16, 2017 04:28 AM2017-02-16T04:28:14+5:302017-02-16T04:28:14+5:30
प्रथम वर्ष २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यास सुरूवात झाली
पुणे : प्रथम वर्ष २०१७-१८ या शैक्षणिक वर्षाच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश पूर्व परीक्षेचे (सीईटी) अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून विद्यार्थ्यांना २३ मार्चपर्यंत आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे ११ मे रोजी ही परीक्षा घेतली जाईल. शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून अभियांत्रिकी प्रवेशासाठी देशपातळीवर एकच परीक्षा होणार आहे. त्यामुळे राज्य शासनाला यंदा शेवटची सीईटी घ्यावी लागणार आहे.
राज्यात काही वर्षांपासून ३७२ अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता सुमारे १ लाख ६० हजार एवढी झाली. परंतु, त्यातील ८० ते ९० हजार जागांवर विद्यार्थी प्रवेश घेतात. परिणामी, राज्यातील ६० ते ७० हजार जागा रिक्त राहतात.
त्यातही पुढील वर्षापासून अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी देशपातळीवर एकच परीक्षा घेण्याचे केंद्र शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.