आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस

By admin | Published: April 5, 2017 12:44 AM2017-04-05T00:44:17+5:302017-04-05T00:44:17+5:30

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी लॉटरी काढण्यात आली

The last day of admission of RTE | आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस

आरटीई प्रवेशाचा अंतिम दिवस

Next

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) दिल्या जाणाऱ्या २५ टक्के आरक्षित जागांच्या प्रवेशासाठी दुसरी फेरी लॉटरी काढण्यात आली. त्यातून प्रवेशासाठी निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांना ५ एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या फेरीतील प्रवेशाचा बुधवारी शेवटचा दिवस आहे. मात्र, प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन प्रवेशाच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला जाईल.
पहिल्या आरटीई प्रवेश फेरीतून ७ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले होते. त्यानंतर प्रवेशाची दुसरी फेरी सुरू करण्यात आली आहे. त्यातून प्रवेश देण्यात आलेल्या सुमारे ५०० विद्यार्थ्यांनी संंबंधित शाळेत जाऊन प्रवेश घेतला असल्याचे दिसून येत आहे. मात्र, काही शाळांनी संकेतस्थळावर माहिती अपलोड केलेली नाही. त्यामुळे सध्या केवळ ७ हजार ७२१ विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याचे दिसून येते. "
आतापर्यंत सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहूनच आरटीई प्रवेशाच्या मुदतवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मुश्ताक शेख यांनी सांगितले.

Web Title: The last day of admission of RTE

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.