अकरावी आॅनलाइन अर्जाचा शेवटचा दिवस
By Admin | Published: June 15, 2015 02:16 AM2015-06-15T02:16:29+5:302015-06-15T02:16:29+5:30
अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. तरी मुंबई विभागातून शनिवारपर्यंत १ लाख ३१ हजार १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाल्याची
मुंबई : अकरावीसाठी आॅनलाइन प्रवेश अर्ज करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस आहे. तरी मुंबई विभागातून शनिवारपर्यंत १ लाख ३१ हजार १९१ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहेत. मंगळवारी त्रुटी दुरुस्त करून अद्ययावत यादी तयार करण्यात येईल. तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमांकाचा अंदाज बांधता यावा म्हणून २० जून रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वसाधारण यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
दरम्यान, अकरावीची पहिली गुणवत्ता यादी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता प्रसिद्ध होणार असल्याचे मुंबई शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाने सांगितले. दुसरी गुणवत्ता यादी ३० जून आणि अंतिम गुणवत्ता यादी ६ जुलैला सायंकाळी ५
वाजता प्रसिद्ध होईल, याची नोंद विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन उपसंचालक कार्यालयाने केले
आहे. (प्रतिनिधी)