मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 10:07 PM2017-08-27T22:07:12+5:302017-08-27T22:17:32+5:30

भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे.

The last flight of Haj pilgrims from mid-night to Mumbai airport will take place in 'Takdaf' towards 'Jeddah' | मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’

मध्यरात्री हज यात्रेकरूंचे अखेरचे विमान मुंबई विमानतळावरून करणार ‘जेद्दाह’च्या दिशेने ‘टेकआॅफ’

Next
ठळक मुद्देमुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणारयात्रेक रुंचे एक विमान रविवारी दुपारी सौदीच्या दिशेने झेपावलेहज यात्रेला येत्या बुधवारपासून (दि.३०) सुरूवात होणार आहे यंदा हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने यात्रेकरूंना सिमकार्ड सौदीचे

अझहर शेख / नाशिक : भारतीय हज कमिटीच्या वतीने वाढविण्यात आलेल्या अतिरिक्त दोन विमानांपैकी अखेरचे विमान हज यात्रेकरूंना घेऊन आज मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावरून सौदी अरेबियामधील जेद्दाह विमानतळाच्या दिशेने झेपावणार आहे.
यावर्षी देशभरातून सुमारे १ लाख ४५ हजार मुस्लीम बांधव यात्रेसाठी रवाना झाले आहेत. यामध्ये महाराष्टतून साडे अकरा हजार यात्रेक रुंचा समावेश असून त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून ११५० यात्रेक रुंचा समावेश आहे. यावर्षी वीस टक्क्याने यात्रेकरू वाढले आहेत. सौदी सरकारकडून वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा लाभ महाराष्टला मिळाला आहे. गेल्या वर्षी सुमारे साडेदहा हजार यात्रेकरु महाराष्ट्रातून रवाना झाले होते.


प्रतीक्षा यादीमधील यात्रेकरुंपैकी सहाशे यात्रेकरू लकी ठरले आहे. वीस टक्के लाभ मिळाल्यामुळे या यात्रेकरुंनाही हज यात्रेची संधी उपलब्ध झाली. यात्रेक रुंचे एक विमान रविवारी दुपारी सौदीच्या दिशेने झेपावले. दुसरे विमान मध्यरात्री टेकआॅफ करणार असल्याची माहिती नाशिकचे हज कमिटीचे समन्वयक जहीर शेख यांनी दिली आहे. हज यात्रेला येत्या बुधवारपासून (दि.३०) सुरूवात होणार आहे. संपुर्ण यात्रा चाळीस दिवसाची असते. बकरी ईदच्या दिवशी यात्रेमधील मुख्य हजचा विधी पुर्ण होणार असून तेथून पुढे चार दिवस यात्रा सुरू राहणार असल्याची माहिती हज समितीच्या सुत्रांनी दिली आहे. महाराष्ट्रातील यात्रेकरुं चे अखेरचे विमान आज मध्यरात्री उड्डाण करणार आहे. यंदा हज कमिटी आॅफ इंडियाच्या वतीने यात्रेकरूंना सिमकार्ड सौदीचे पुरविण्यात आल्यामुळे यात्रेकरुंचा संपर्क तुटण्याची शक्यता धुसर झाली आहे.


 

Web Title: The last flight of Haj pilgrims from mid-night to Mumbai airport will take place in 'Takdaf' towards 'Jeddah'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.