सखी मंच नोंदणी अंतिम टप्प्यात!

By admin | Published: March 12, 2016 02:24 AM2016-03-12T02:24:59+5:302016-03-12T02:24:59+5:30

नवनवीन कार्यक्रम, स्पर्धांचा खजिना घेऊन ‘लोकमत - सखी मंच’ सज्ज झाले आहे. शिवाय, भरपूर बक्षिसांची लयलूटही करता येणार आहे.

Last phase of Sakhi forum registration! | सखी मंच नोंदणी अंतिम टप्प्यात!

सखी मंच नोंदणी अंतिम टप्प्यात!

Next

मुंबई : नवनवीन कार्यक्रम, स्पर्धांचा खजिना घेऊन ‘लोकमत - सखी मंच’ सज्ज झाले आहे. शिवाय, भरपूर बक्षिसांची लयलूटही करता येणार आहे. यासाठी सुरू असलेल्या ‘लोकमत - सखी मंच सभासद नोंदणी’ला भरघोस प्रतिसाद मिळत असताना आता ही नोंदणी अंतिम टप्प्यात आली आहे.
सभासद नोंदणीवर मोफत असणाऱ्या गिफ्ट हॅम्पर्समध्ये दादरच्या क्लासिक ब्युटी पार्लरचा हेड मसाज, मुलुंडच्या जे अ‍ॅण्ड एस ब्युटी पार्लरचे ग्लो फेशियल आणि दादरच्या फेसकट ब्युटी पार्लरचे फेशियल, ब्लीच यांचा समावेश आहे. त्यामुळे सखी वेगळाच आनंद अनुभवत आहेत. शिवाय, या सर्व पार्लर्सचे विशेष कौतुकही सखींनी केले आहे.
मोफत ट्रीटमेंटसोबतच सौंदर्याशी निगडित अनेक गोष्टींची माहितीही सखींना या माध्यमातून मिळत आहे. सभासद नोंदणीवर ‘अबीरगुलाल’, ‘तिन्ही सांज’ आणि ‘सेल्फी’ ही नाटके पाहण्याची संधी मिळणार आहे.
सभासद नोंदणीचे शेवटचे काहीच दिवस शिल्लक आहेत. सखींनी लवकरात लवकर सभासद नोंदणी केल्यास ४ हजार रुपयांच्या भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Last phase of Sakhi forum registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.