सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 10:46 AM2024-02-27T10:46:44+5:302024-02-27T10:47:34+5:30

देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

Last request to the government, don't take the wrath of the Maratha; Manoj Jarange Patil got angry again on Devendra Fadnavis | सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पुन्हा संतापले

छत्रपती संभाजीनगर - Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis ( Marathi News ) सरकारला शेवटची विनंती, मराठ्यांचा रोष अंगावर घेऊ नका. मराठा समाजाचे पुढचे आंदोलन साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनात करा. जनता मालक की सरकार बघूया. मराठा समाजातील वकिलांना विनंती आहे ज्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्यांच्यासाठी लढा. वकिलांनी मोफत लढावे, न्यायालयातून जामीन करून घ्या. देवेंद्र फडणवीस हे मुद्दाम करतायेत. तुम्ही सगळ्यांनी शांततेत राहा. मी बघतो काय करायचे असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा दिला आहे. 

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांवर निशाणा साधला. जरांगे पाटील म्हणाले की,घटनेने आम्हाला मुलभूत स्वातंत्र्य दिलंय, संचारबंदी लागू करता, मराठ्यांविषयी एवढा खूनशीपणा दाखवता. मराठ्यांच्या बाजूने आमदारांनी बोलायला हवे. तुम्ही नेत्यांसाठी बोलताय. पक्षातील नेत्यांसाठी आमदार बोलतायेत, पण मी मराठा समाजासाठी बोलतोय. नेत्यांकडून बोलतायेत, मला दोषी ठरवतायेत. नेत्याला जातीपेक्षा मोठे समजायला लागलेत. तू जातीकडून बोल, नेत्याकडून बोलू नको. चूक केली तर सोडणार नाही. मराठा समाजावर माझी निष्ठा आहे. मी फटकळ बोलतोय असं काहींना वाटेल, पण समाजाविरोधात गेला तर मी बोलतो. मी समाजाला दैवत मानलंय. गोरगरिब मराठा समाजासाठी मी लढतोय. मराठा आणि सत्तेच्या मधला मी अडसर ठरतोय असं सरकारला वाटतो. सगेसोयरे आणि ओबीसीतूनच आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आता माझ्याविरोधात बोलायला काहींना सांगितले. नाईलाजास्तव पक्षातील आमदार माझ्याविरोधात बोलतील. पण मराठा समाजाने माझ्यासोबत राहावे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांविरोधात काम करणारच. सहा महिन्यात देवेंद्र फडणवीसांवर केलेला आरोप दाखवा असं त्यांनी म्हटलं. 

तसेच अंतरवालीतील गुन्हे जाणूनबुजून ठेवलेत. कुठे ना कुठे गौप्यस्फोट करणे गरजेचे होते. संचारबंदी लावायला कापाकापी झाली होती का? कसं लावली? आम्ही दहशतवादी आहोत का? मराठ्यांवर हा अन्याय आहे. मराठ्यांनी घाबरण्याची गरज नाही. आपण कोर्टात जाऊ. काय करायचे ते करू द्या. तुम्ही मराठ्यांची मर्यादा तोडली म्हणून आम्ही बोललो. आम्ही त्यादिवशी पुढे सरकलो असतो, तर पोलिसांनी लाठीचार्ज केला असता. आमच्यासोबत ५ हजार महिला आणि २५ हजार कार्यकर्ते होते. जर काही घडलं असतं तर संपूर्ण राज्य बेचिराख झालं असतं म्हणून आम्ही मागे सरकलो असं विधान मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून काही झालं असतं तर राज्यातला मराठा पेटून उठला असता. आम्ही शहाणपणाची जबाबदारी घेतली. तुम्ही स्वागत करायला पाहिजे. तुम्ही मराठ्यांचे आमदारसोबत घेतले. १० टक्के आरक्षणाविरोधात लोकांनी कोर्टात धाव घेतली. तुमच्या हातातून वेळ गेली नाही आणखी रोष घेऊ नका. काय गुन्हे दाखल करायचे ते करा, आम्ही न्यायालयातून जामीन घेऊ. तुम्ही जिंकणार नाही, तुम्हाला हा पठ्ठ्या हरवणारच. मराठ्यांना न्याय द्या हीच माझी मागणी आहे असंही जरांगे म्हणाले. 
 

Web Title: Last request to the government, don't take the wrath of the Maratha; Manoj Jarange Patil got angry again on Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.