आरोग्य विज्ञान अभ्यासक्रम प्रवेशाचा अखेरचा राऊंड दिवाळीच्या दिवशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2016 07:39 PM2016-10-26T19:39:10+5:302016-10-26T19:39:10+5:30
आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अखेरच्या राऊंडसाठी चक्क दिवाळीचा दिवस आणि त्यातही रविवार निवडण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष
Next
style="font-family: HelveticaNeue, "Helvetica Neue", Helvetica, Arial, "Lucida Grande", sans-serif; font-size: 16px;">
ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. 26 - आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या अखेरच्या राऊंडसाठी चक्क दिवाळीचा दिवस आणि त्यातही रविवार निवडण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र असंतोष पाहायला मिळत आहे.
शासकीय, महानगरपालिका, शासन अनुदानित आणि विनाअनुदानित बीएएमएस, बीयूएमएस, फिजिओथेरपी, बीएचएमएस, अॅक्यूपेशनल थेरपी, बीएएसएलपी, बी(पी अँड ओ), बीएससी नर्सिंग महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया शासनाच्या मुंबई येथील राज्य सामायिक प्रवेश प्रक्रिया कक्षाद्वारे राबविली जात आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांशी संबंधित महाविद्यालयांच्या प्रवेशासंबंधी २४ आॅक्टोबर रोजी परीक्षा कक्षाने वेळापत्रक जाहीर केले आहे. आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमांच्या संबंधित महाविद्यालयांची एकत्रित निवड यादी २४ आॅक्टोबर रोजी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उपरोक्त प्रवेशाचे आत्तापर्यंत तीन राऊंड झाले आहे. अखेरच्या राऊंडसाठी २९ आॅक्टोबरला यादी जाहीर केली जाईल आणि त्याच्या प्रत्यक्ष प्रवेशासाठी चक्क रविवार, ३० आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळात विद्यार्थी व पालकांना बोलाविण्यात आले आहे. विशेष असे, या दिवशी लक्ष्मीपूजन आहे. रविवार असल्याने सर्वत्र शासकीय सुटी असते. वर्षभरापूर्वी जाहीर झालेल्या गॅझेटमध्ये लक्ष्मीपूजनाची सुटी नोंद आहे. त्यानंतरही राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (मुंबई) शेवटच्या राऊंडच्या प्रवेशासाठी रविवारचा आणि त्यातही लक्ष्मीपूजनाचा दिवस निवडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून या कक्षाचा एकूणच कारभार कसा असेल, याची कल्पना येते. प्रवेशासाठी शुल्क भरायचे असते, त्यासाठी डीडी लागतो. रविवारी बँका बंद असताना डीडी मिळणार कसा, याचा विचारही या कक्षाने केला नसल्याचे दिसते. दिवाळीच्या दिवशी शैक्षणिक शुल्क व मूळ कागदपत्रांसह बोलाविले गेल्याने तसेच याच दिवशी स्पॉट अॅडमिशनचा राऊंड होणार असल्याने आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी व त्यांच्या पालकांमध्ये तीव्र रोष पाहायला मिळत आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचा हा कारभार काही पालकांनी सोशल मिडियाद्वारे राज्यातील खासदार, आमदारांपर्यंत पोहोचविला आहे. त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा केली जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)