टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी
By admin | Published: September 11, 2016 09:15 AM2016-09-11T09:15:55+5:302016-09-11T09:15:55+5:30
भारतातील सर्वात वेगवान मानल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. 12 तासांपेक्षाही कमी वेळात टॅल्गो ट्रेनने दिल्ली ते मुंबई हे अंतर पार केलं
Next
-ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि.11- भारतातील सर्वात वेगवान मानल्या जाणा-या टॅल्गो ट्रेनची अंतिम चाचणी यशस्वी झाली आहे. 12 तासांपेक्षाही कमी वेळात टॅल्गो ट्रेनने दिल्ली ते मुंबई हे अंतर पार केलं.
शनिवारी दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी टॅल्गो दिल्लीहून मुंबईसाठी निघाली होती. 11 तास 48 मिनिटांत हे अंतर पूर्ण करत टॅल्गो आज पहाटे 2 वाजून 33 मिनिटांनी मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली.अंतिम चाचणीवेळी टॅल्गोचा वेग ताशी 150 किलोमीटर ठेवण्यात आला होता.
2 ऑगस्ट रोजी टॅल्गो ट्रेनची पहिली चाचणी झाली होती. दिल्ली ते मुंबई दरम्यान ही चाचणी पार पडली होती.साधारणतः टॅल्गो ट्रेनचा वेग हा 200 किमी प्रतितास असतो. मात्र भारतीय रेल्वे ट्रॅकची स्थिती पाहता सध्या हा वेग तुलनेने कमी ठेवला आहे. कालांतराने ट्रेनचा वेग वाढवण्यात येणार आहे. सध्या सुपरफास्ट राजधानी एक्स्प्रेसने नवी दिल्ली ते मुंबई प्रवासासाठी 16 तास लागतात.