अकरावी आॅनलाईनला शेवटचे तीन दिवस

By admin | Published: June 15, 2016 04:18 AM2016-06-15T04:18:02+5:302016-06-15T04:18:02+5:30

अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक

Last three days in eleven online | अकरावी आॅनलाईनला शेवटचे तीन दिवस

अकरावी आॅनलाईनला शेवटचे तीन दिवस

Next

मुंबई: अकरावी आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने आॅनलाईन प्रवेश नोंदणीने चांगलाच वेग घेतला आहे. आता नोंदणी दोन लाख पार गेल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली.
अकरावीसाठी आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी तीन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत नोंदणी अर्जामध्ये एसएसई बोर्डाचा आकडा सर्वाधिक म्हणजे १ लाख ८५ हजार १४४ इतका आहे. तर आयबी बोर्डातून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वात कमी आहे. पसंती अर्जातही एसएसईचा आकडा सर्वाधिक म्हणजेच १ लाख ६३ हजार ९५२ असून आयबी बोर्डाचा आकडा सर्वात कमी आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागाने दिली आहे. मात्र अजूनही काही विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असल्याचे निदर्शनास आले आहे. आॅनलाईन नोंदणीसीठी दोन अर्ज असून यातील नोंदणी अर्ज भरल्यानंतर महाविद्यालयांच्या निवडीसाठी पसंती फॉर्म भरणेही अनिवार्य आहे. पण अजूनही विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज आणि पसंती अर्ज भरला नसेल तर तो तातडीने भरुन मंजुर करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन प्रवेश नोंदणी प्रक्रिया १६ मे पासून सुरु झाली होती. १७ जून हा नोंदणीचा शेवटचा दिवस असून यासाठी

03
दिवस शिल्लक आहेत.


नोंदणी अर्ज
बोर्डअपूर्णकन्फर्मअप्रुव्हएकूण
एसएससी१५२५७८६११७५३३११८५१४४
सीबीएसई३५८६५३४७१७५७६७
आयसीएसई४२३६४८३१५८७४८
आयबी२०२४
आयजीसीएसई१७११२१६२८२०
एनआयओएस२५११२१६२३०१
इतर३७२२६३९८६६३
पसंती अर्ज
बोर्डअपूर्णपूर्ण अप्रुव्ह एकूण
एसएससी ६९९२१७३७१५५२२३१६३९५२
सीबीएसई३६९६१३७१९४२२१
आयसीएसई४२४८४७२४८७७५६
आयबी००२२
आयजीसीएसई४९५५७३६२७
एनआयओएस१८१११०१२९
इतर २१० ३०७३२८

Web Title: Last three days in eleven online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.