आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा आठवडा

By admin | Published: June 12, 2016 04:42 AM2016-06-12T04:42:43+5:302016-06-12T04:42:43+5:30

अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठीचा हा शेवटचा आठवडा असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Last week of the online admission process | आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा आठवडा

आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा आठवडा

Next

मुंबई : अकरावीच्या आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेसाठीचा हा शेवटचा आठवडा असून आतापर्यंत दीड लाखांहून अधिक अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आॅनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जून आहे.
एसएससी, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, आजीसीएसई, एनआयओएस आणि इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी आॅनलाईन नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आॅनलाईन नोंदणी सोबत, पसंतीक्रम अर्ज भरणे अनिवार्य होते. आॅफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार नसल्यामुळे निकालानंतर आॅनलाईन नोंदणी हाच पर्याय उपलब्ध आहे. नोंदणी केलेल्या एकूण अर्जांमध्ये एसएससी बोर्डातून सर्वाधिक म्हणजे १ लाख ३२ हजार ५९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज केले आहेत, तर आयबी बोर्डातून सर्वात कमी म्हणजे आता पर्यंत २ अपूर्ण आणि २ कन्फर्म नोंदणी अर्ज करण्यात आले आहेत, तर पसंतीक्रम नोंदणीत ही आयबीचा आकडा सगळ््यात कमी आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक विभागने दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Last week of the online admission process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.