Lata Mangeshkar: लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत पाठीशी उभे राहायचे बाळासाहेब, असे होते दोघांचे नाते...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 10:37 AM2022-02-06T10:37:49+5:302022-02-06T11:05:11+5:30
लता मंगेशकर बाळासाहेब ठाकरे यांचे नाते सर्वश्रृत आहे. लता दीदी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानायच्या.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले. मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना आधी कोरोना आणि नंतर न्युमोनियाची लागण झाली होती. लता दीदी आणि शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Bal Thackeray) यांचे नाते सर्वश्रृत आहे. लतादीदींनी बाळासाहेबांना मोठा भाऊ मानायच्या. तर, बाळासाहेबदेखील लता दीदींच्या प्रत्येक अडचणीत त्यांच्यासोबत उभे असायचे.
लता मंगेशकरांसाठी बाळ ठाकरे मोठ्या भावाप्रमाणे होते. ठाकरे प्रत्येक कठीण प्रसंगी लतादीदींच्या पाठीशी उभे राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे चित्रपटविश्वातील अनेक अभिनेत्यांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध असले तरी लतादीदींना सर्वोच्च स्थान दिले. बाळ ठाकरे यांचे निधन झाले तेव्हा लतादीदींना आपल्या वडिलांची सावली पुन्हा डोक्यावरुन उठल्याची भावना व्यक्त केली होती.ल
बाळासाहेब ठाकरेंचे चित्रपट जगतातील दिग्गज कलाकारांशी त्यांचे खास नाते होते. पण, लता मंगेशकर यांच्याबद्दल विशेष आदर होता. त्यांचा लता मंगेशकरांवर इतका विश्वास होता की, मृत्यूपूर्वी त्यांनी लता दीदींना भेटायला बोलावले होते आणि माझे अखेरचे काही दिवस राहिल्याची भावना दीदींसमोर व्यक्त केली होती. बाळासाहेबांनी लता मंगेशकर यांचा नेहमीच आदर केला. ते त्यांना देशाचा तसेच मराठी समाजाचा अभिमान मानत. लता दीदींच्या मनातही बाळासाहेबांबद्दल खूप आदर होता. बाळासाहेबांच्या पुण्यतिथी आणि जयंतीनिमित्त लता मंगेशकर त्यांना नेहमी त्यांचे स्मरण करत असे.