Mumbai Rain Live Updates : कुर्ला स्थानकातून ठाण्यासाठी विशेष लोकल सुटली

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 09:05 AM2019-09-04T09:05:21+5:302019-09-04T19:49:56+5:30

मुंबई - मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पुणे, कोल्हापूर याठिकाणी ...

Latest Mumbai Rain, Maharashtra Rain live Update News in Marathi | Mumbai Rain Live Updates : कुर्ला स्थानकातून ठाण्यासाठी विशेष लोकल सुटली

Mumbai Rain Live Updates : कुर्ला स्थानकातून ठाण्यासाठी विशेष लोकल सुटली

Next

मुंबई - मुंबईसह राज्याच्या अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून पुणे, कोल्हापूर याठिकाणी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसामुळे मुंबईतील रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहे. तर वेस्टर्न आणि इस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक संथगतीने सुरू आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. 

LIVE

Get Latest Updates

08:57 PM

पावसात अडकलेल्यांना सिद्धिविनायक मंदिरात राहण्याची सोय

 

मुसळधार पावसाने सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले असून रेल्वे सेवा ठप्प असल्याने अनेकांना घर गाठणं मुश्किल झालं आहे. पावसात अडकलेल्यांना सिद्धिविनायक मंदिरात राहण्याची सोय करण्यात आली असल्याचे आवाहन श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी केले आहे. 

08:54 PM

परळचा राजा मंडळाने प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकात अडकलेल्यांना केली जेवणाची मदत

परळचा राजा मंडळाने प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकात अडकलेल्यांना केली जेवणाची मदत 

08:32 PM

कुलाब्यात ७०. मिमी आणि सांताक्रूझ परिसरात २१४.४ मिमी सरासरी पावसाची नोंद

 

मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पावसाने झोडपले असून कुलाब्यात ७०. मिमी आणि सांताक्रूझ परिसरात २१४.४ मिमी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 

08:24 PM

ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांमध्ये चेंगराचेंगरी 

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे पूर्णपणे कोलमडलेली असल्याने प्रवाश्यांचा खोळंबा झाला होता. त्यामुळे लोकल ट्रेन हळूहळू पूर्वपदावर येत असताना चाकरमान्यांची घर गाठण्यासाठी तारेवरची कसरत सुरु आहे. रेल्वे सेवा बंद असल्याने ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाश्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. 

08:19 PM

अंधेरी रेल्वे स्थानकात महिला प्रवाश्यांनी रोखली लोकल

 

अंधेरी रेल्वे स्थानकात संतप्त महिला प्रवाश्यांनी लोकल ट्रेन रोखली आहे. त्यामुळे अंधेरी रेल्वे स्थानकात एकाच खळबळ उडाली आहे. 

08:06 PM

मुंबई - तब्बल दोन तासांनी अंधेरीहून चर्चगेटच्या दिशेने लोकल रवाना

08:04 PM

जखम असल्यास व पावसाच्या पाण्यातून चालल्यास लेप्टोची शक्यता अधिक


07:56 PM

पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची पालिकेच्या शाळांमध्ये निवाऱ्याची सोय


 

07:49 PM

वसई लोकलला प्रवाशांची मोठी गर्दी

07:37 PM

कुर्ला स्थानकातून ठाण्यासाठी विशेष लोकल सुटली

07:28 PM

पाऊस दाटलेला... ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड या अलर्टचा नेमका अर्थ तुम्हाला माहीत आहे का?

07:17 PM

मोनो रेल विस्कळीत,  प्रवासी वाढल्याने तासभर मोनोच्या फेऱ्यांना विलंब

07:05 PM

आज दिवसभरात एकूण 77 बस बंद पडल्या. त्यातील 40 बसेस पाण्यामुळे बंद पडल्या. एकूण 77 पैकी 16 बसेस दुरुस्त करण्यात आल्या.

06:47 PM

कामावरुन घरी जाण्यासाठी निघालेले प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले असून या प्रवाशांना बृहन्मुंबई महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

06:30 PM

मुंबई - चर्चगेट ते वसईरोड जलद लोकलसेवा सुरू 

06:23 PM

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

06:13 PM

नालासोपारा येथे रेल्वे रुळावर साचले पाणी


 

05:56 PM

येत्या 24 तासांत मुंबई, ठाण्यासह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा

05:41 PM

पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा - आदित्य ठाकरे 

05:35 PM

मिठी नदीच्या आसपासच्या रहिवाशांना तात्पुरते पालिकेच्याच्या निवाऱ्यामध्ये सुरक्षित हलविण्यात आले आहे.

05:30 PM

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस, मुसळधार पावसाचा हवाई वाहतुकीलाही फटका

05:19 PM

हवामान ‍विभागाकडून पुढील 24 तासांत मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच नाशिक, सातारा, कोल्हापूर घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

05:08 PM

सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण 43 पंप

प्रत्येक उदंचन केंद्रात तेथील आवश्यकतेनुसार सहा ते दहा एवढ्या संख्येने पंप असून या प्रत्येक पंपाची क्षमता ही दर सेकंदाला तब्बल 6 हजार 600 लिटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. सर्व सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण 43 पंप असून त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता त्यापैकी 24 पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत.

04:55 PM

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढ्या संख्येने चालू करण्यात आले आहेत. 

04:54 PM

मुंबईतील 'या' विभागात पडला सर्वाधिक पाऊस, महापालिकेने दिली आकडेवारी

04:47 PM

पूर्व द्रूतगती महामार्गावर ठाण्याच्या दिशेने प्रचंड वाहतूक कोंडी

04:41 PM

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज सकाळी ८ ते दुपारी २ या सहा तासांच्या कालावधीत शहर परिसरात सरासरी 100.97 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

04:31 PM

खाकीतली माणुसकी! भरपावसात खांद्यावर उचलून नागरिकांना दिला मदतीचा हात

04:22 PM

लालबागच्या राजाचं दर्शन फक्त 10 मिनिटांत; मुसळधार पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरली

04:13 PM

धुव्वाधार पावसाने मुंबईची 'हालत खराब'; फोटो सांगतील 'रेन की बात'

02:56 PM

तुळींज पोलीस स्टेशनमध्ये शिरलं पाणी

पालघरच्या तुळींज पोलीस स्टेशनमध्ये पावसामुळे पाणी घुसलं, पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा पोलिसांनी बसला फटका 

02:16 PM

मुंबई विमानतळावरील हवाई सेवा पाऊण तास उशिराने

मुंबई विमानतळावरील हवाई सेवा पाऊण तास उशिराने 

 

01:45 PM

NDRF च्या दोन टीम पनवेल आणि रायगडला रवाना

मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सावित्री नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुण्याहून एनडीआरएफच्या 2 टीम पनवेल आणि रायगडसाठी खबरदारी म्हणून रवाना झाल्या आहेत.

01:43 PM

सायन रेल्वे स्थानकात रुळावर साचले पाणी, रेल्वे ठप्प

12:55 PM

ठाणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प

विक्रोळी-कांजुरमार्गदरम्यान पाणी साचल्याने मध्य रेल्वेवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ठाणे ते कसारा, कर्जत वाहतूक सुरू आहे. 

12:43 PM

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नालासोपारा स्टेशनवर रुळावर साचलं पाणी

नालासोपारा रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प झाली आहे. वसई-विरार दरम्यान रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. 

12:09 PM

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; सायनदरम्यान रेल्वे रुळावर साचलं पाणी

मुसळधार पावसामुळे मुंबईची मध्य रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. सायन-माटुंगा दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

11:44 AM

पावसामुळे मुंबईतील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी

11:42 AM

कोकण भवन इमारतीत 3 फूट पाणी; कर्मचाऱ्यांची झाली तारांबळ

नवी मुंबईतील कोकण भवनला मिनी मंत्रालय म्हटले जाते. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकण भवन इमारतीच्या आवारात सुमारे तीन फूट पाणी साचल आहे.

11:38 AM

नवी मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं

11:04 AM

मुंबई, ठाणे, कोकण परिसरात शाळांना सुट्टी जाहीर

पावसामुळे मुंबई, ठाणे, कोकण परिसरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच राज्यातील शाळांना पावसाची परिस्थिती पाहून स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत निर्देश शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी दिले आहेत. 

10:49 AM

सायन पनवेल महामार्गावर सानपाडा नेरुळ येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी 

सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे नवी मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर बसला आहे. सायन पनवेल महामार्गावरील सानपाडा नेरुळ येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी  झाली आहे. 

 

10:45 AM

पावसामुळे गणेश मंडळांनी वीज प्रवाह खंडीत करावा

गणेश मंडळाच्या वीज मंडपात वीज प्रवाहित होण्याची शक्यता लक्षात घेता सर्व गणेश मंडाळांनी वीज प्रवाह खंडीत करावा असं आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केलं आहे. 

10:26 AM

सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

10:22 AM

कोयना, राधानगरी, मुळधी धरणातून पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

मुळशी धरण परिसरामध्ये पर्ज्यन्यमानात वाढ होत असून धरणातून सकाळी ७:०० वाजता विसर्ग ६३०० क्यूसेस वरून १०,००० क्यूसेस करण्यात आलेला आहे. तसेच साताऱ्यातील कोयना धरण 38963 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 

09:58 AM

मुंबईतील शाळांना सुट्टी देण्याबाबत महापालिकेकडून सूचना

09:14 AM

पश्चिम रेल्वेवरील वाहतुकीवर अद्याप परिणाम नाही

09:13 AM

मुंबई महापालिकेने केलं मुंबईकरांना आवाहन

शहरात पडणाऱ्या पावसामुळे मुंबईकरांनी समुद्रकिनारी तसेच साचलेल्या पाण्यातून चालू नये असं आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आलं आहे. 

09:11 AM

गांधी मार्केटजवळ पाणी साचल्याने बेस्ट दुसऱ्या मार्गाने वळविल्या

गांधी मार्केट येथे पाणी साचल्यामुळे किंग्जसर्कल आणि सायन रोड नं 24 वरील बेस्ट वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.  

09:07 AM

मुंबईच्या सायन परिसरात पावसामुळे पाणी साचलं

Web Title: Latest Mumbai Rain, Maharashtra Rain live Update News in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.