संभाजीराव पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूर जिल्ह्यात जल्लोष

By admin | Published: July 8, 2016 02:58 PM2016-07-08T14:58:56+5:302016-07-08T15:06:33+5:30

भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकरांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूरसह निलंगा, औराद शहाजानी, देवणी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

Latur district is celebrated as a result of Sambhaji Rao's involvement in the Cabinet | संभाजीराव पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूर जिल्ह्यात जल्लोष

संभाजीराव पाटलांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूर जिल्ह्यात जल्लोष

Next

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. ८ -  निलंगा विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश झाल्याने लातूरसह निलंगा, औराद शहाजानी, देवणी येथे भाजपा कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी पेढे, साखर वाटून व फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़
राज्याच्याच नव्हे तर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान असणाऱ्या लातूर जिल्ह्यास गेल्या दोन वर्षांपासून मंत्रिपद मिळाले नव्हते़ त्यामुळे जिल्हावासीयांच्या लाल दिव्याकडे नजरा लागून होत्या़ अखेर निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचा राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश झाला आहे़ आ़ संभाजीराव पाटील यांनी शुक्रवारी सकाळी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेताच इकडे लातूर, निलंगा, देवणी येथील भाजपा कार्यकर्त्यांनी व आ़ पाटील यांच्या समर्थकांनी जल्लोष साजरा केला़
लातूर शहरात महात्मा बसवेश्वर चौकात भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला़ यावेळी महाराष्ट्र स्टुडंस् फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती़ निलंगा येथील छत्रपती शिवाजी चौक, मॉ जिजाऊ चौक, शिवाजीनगर हाडगा रोड, आनंदमुनी चौक, दापक वेस, कासाशिरसी मोड, जुनी पेठ, छत्रपती संभाजी चौक येथे भाजपा कार्यकर्त्यांनी पेढे, साखर वाटून तसेच फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला़ यावेळी दगडू सोळुंके, रमेश सातपुते, राम पाटील, राम भंडे, आनंद अट्टल, विक्रम मोहळकर, सत्यवान धुमाळ, सिध्दू कांबळे, विकास उजळे, बाळू माने, विठ्ठल व्होरा, विठ्ठल पांचाळ, शकील शेख, तुकाराम माळी आदींची उपस्थिती होती़
तसेच निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील चौकाचौकांत पेढे वाटून व फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला़ यावेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रदीपकुमार पाटील, उपसभापती लक्ष्मण आकडे, संचालक नारायण बियाणी, सुधाकर शेटगार, सुभाष डावरगावे, तानाजी बिरादार, शिवपुत्र आग्रे, बालाजी पाटील, सतीश कत्ते, रावसाहेब मुळे, कुमार मंडगे, निर्भय पिचारे, रमेश क्षीरसागर, माजी सरपंच डॉ़ मल्लिकार्जून शंकद, पंचायत समिती सदस्य रज्जाक रक्साळे, मल्लिकार्जून लातुरे, शाहूराज थेटे, दीपक चांडक, सुभाष डावरगावे आदी उपस्थित होते़ निलंगा विधानसभा मतदारसंघातील देवणी येथेही भाजपा कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला़ यावेळी वैजनाथ अष्टुरे, राजेश कोतवाल, अमर पाटील, रमेश मन्सुरे आदी उपस्थित होते़


हे तर संभाजीरावांच्या कामाचे कौतुक
आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कष्टाचे चीज झाले आहे़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक लढे दिले आहेत़ अखेर पक्षश्रेष्ठीने त्यांना कॅबिनेटमंत्रीपद देऊन कामाचे कौतुक केले आहे़ सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे संभाजीराव नक्कीच मंत्रिपदाला न्याय देतील, अशी अपेक्षा त्यांच्या मातोश्री माजी खासदार रुपाताई पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केली़

धडाडीचे नेतृत्व
माझे पती म्हणून मी बोलत नाही़ प्रस्थापितांच्या विरोधात निलंगा तालुक्यात मोट बांधून संभाजीरावांनी सामान्यांना न्याय दिला आहे़ आता त्यांच्याकडे मंत्रीपद आले आहे़ मराठवाड्यातील आघाडीचे नेतृत्व ते सिध्द करतील़ यात शंका नाही आणि मंत्रीपदातून जनतेची सेवाही करतील, याची खात्री असल्याचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पत्नी प्रेरणाताई निलंगेकर म्हणाल्या़

Web Title: Latur district is celebrated as a result of Sambhaji Rao's involvement in the Cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.