स्वच्छतेसाठी लातूर जि. प. च्या सीईओंचा १६ किमी सायकल प्रवास

By admin | Published: October 16, 2016 07:22 PM2016-10-16T19:22:15+5:302016-10-16T19:22:15+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी रविवारी सकाळी सायकलवर प्रवास केला़ राजीव गांधी चौकातून पाखरसांगवी गावापर्यंतचा ८ किमी प्रवास सायकलवर

Latur district for cleanliness Par. CEO's 16 km cycle ride | स्वच्छतेसाठी लातूर जि. प. च्या सीईओंचा १६ किमी सायकल प्रवास

स्वच्छतेसाठी लातूर जि. प. च्या सीईओंचा १६ किमी सायकल प्रवास

Next
>ऑनलाइऩ लोकमत
लातूर, दि. 16 - जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी रविवारी सकाळी सायकलवर प्रवास केला़ राजीव गांधी चौकातून पाखरसांगवी गावापर्यंतचा ८ किमी प्रवास सायकलवर करण्यात आला़ सकाळी ६ वाजता ते लातुरातून निघाले आणि पाखरसांगवीत ६़३० वाजता पोहोचले़ त्यांनी गावातील स्वच्छतेची पाहणी करून ग्रामस्थांना हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आवाहन केले़ जाण्या-येण्याचे १६ कि़मी़ अंतर सायकलवर पार करून स्वच्छता अभियानाबरोबर सदृढ आरोग्य ठेवण्याचा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला आहे़ 
मिशन स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ माणिक गुरसळ यांनी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया रविवारी लातूर लगतच्या गावांना सायकलवर भेटी देण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार रविवारी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली़ सकाळी ६ वाजता राजीव गांधी चौकात सीईओ गुरसळ यांच्या आदेशानुसार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी डॉ़ संजय तुबाकले, प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी बाळासाहेब शेलार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही़एस़ चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ संतोष नवले, गटविकास अधिकारी धस, संवाद तज्ञ उद्धव फड एकत्र आले आणि थेट पाखरसांगवी सायकलवर गाठली़ ८ कि़मी़ अंतर सायकलवर न थकता या अधिकाºयांनी पार केले़ तेथे गेल्यानंतर सरपंच महानंदा बोयणे, उपसरपंच साहेबराव देशमुख व गावकºयांची भेट घेतली़ पाखरसांगवीत बहुतांश ग्रामस्थांकडे शौचालय आहेत़ परंतु, त्याचा वापर केला जात नाही़ उघड्यावर शौचालयाला जात असल्याचे निदर्शनास आले़ त्यामुळे सीईओंनी सरपंचा समवेत गावकºयांची छोटेखानी बैठक घेतली़ यावेळी त्यांनी शौचालयाचा वापर करून गाव हागणदारीमुक्त करण्याची सूचना केली़ सरपंच महानंदा बोयणे यांनी सीईओंच्या या सूचनेला होकार देत गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेतला़.
 
१८ वर्षानंतर चालविली सायकल़़-
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे म्हणाले, आता सायकलवर फिरण्याचा योग्य येईल, असे वाटले नव्हते़ कॉलेजला असतानाच सायकलवर फिरत होतो़ १८ वर्षानंतर पहिल्यांदाच १६ कि़मी़चे अंतर सायकलवर फिरलो़ सायकलींग करणे व्यायामाचाच प्रकार आहे़ स्वच्छता अभियानाबरोबर आमचाही व्यायाम या उपक्रमामुळे होणार आहे़ मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या सूचनेनुसार आता महिन्याच्या पहिल्या आणि तिसºया रविवारी आमची सायकल फेरी राहणार आहे़

Web Title: Latur district for cleanliness Par. CEO's 16 km cycle ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.