लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

By admin | Published: April 12, 2016 02:16 AM2016-04-12T02:16:55+5:302016-04-12T07:53:15+5:30

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या

Latur gets water 'Express'! | लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

लातूरच्या अंगणी आली पाणी ‘एक्सप्रेस’ !

Next

- दत्ता थोरे,  लातूर

पाच पाच लाख लिटर पाणी घेऊन मिरजेहून निघालेली जलपरी उर्फ पाणी एक्सप्रेस अखेर लातूर जिल्ह्यात आली. सकाळी ११ वाजून १० मिनिटातून डिपार्चर झालेल्या जलपरीने मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास लातूर जिल्ह्यात प्रवेश केला. औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी थांबली होती. लातूरच्या रेल्वेस्थानकावर स्वागतासाठी थांबलेली गर्दी रेल्वे येणार नसल्याची कुणकूण लागल्यावर निघून गेली. स्वागताविना पहाटे ४ वाजेपर्यंत जलपरी औसा स्थानकावर उभी होती. 

पाणी एक्सप्रेसला दहा वॅगन जोडलेले असून, प्रत्येक वॅगमध्ये ५० हजार लिटर पाणी आहे. मिरज रेल्वे स्थानकात हे पाणी भरण्यात आले होते. पाणी एक्सप्रेसची ही पहिली फेरी एकप्रकारची चाचपणी असून, त्यानंतर आणखी काही फे-या होणार आहेत. 
पाणी एक्सप्रेस जिथे थांबली आहे तिथून पाच ते सात कि.मी.च्या अंतरावरील एका मोठी विहीर जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
 
ट्रेनमधून पाणी विहीरीपर्यंत पोहोचवण्यासाठी  पाईपलाईनची व्यवस्था करण्यात आली आहे. विहीरीमध्ये जमा होणारे पाणी तहानलेल्या भागांपर्यंत पोहोचवण्यासाठी लातूर प्रशासनाने ७० टॅंकरची व्यवस्था केली आहे. या सर्व टॅंकरची मिळून एकूण २२ हजार लिटर पाणी वाहून नेण्याची क्षमता आहे. 

लातूर जिल्ह्याच्या हद्दीत आल्यानंतर ही जलपरी मुरुड-अकोला (ता. लातूर) नजिक औसा रोड स्टेशनवर आली आणि लातूरसह महाराष्ट्राच्या इतिहासात अनोखी नोंद झाली. लातूरपासून २५ कि.मी. अंतरावर असलेल्या मुरुड-अकोला नजिक औसा रोड स्टेशनवर पहाटे ४ वाजेपर्यंत ही जलपरी थांबली होती.

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ‘१५ दिवसात लातूरला रेल्वेने पाणी देणार’ ची घोषणा केली. मागच्या वर्षी आॅगस्टमध्येही अशीच घोषणा झाली खरी. पण पाणी आले नव्हते. यंदा घोषणेनंतर सातव्या दिवशीच पाणी आल्याने लातूरकरांच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पाच लाख लिटर पाण्याचे दहा रॅक घेऊन निघालेली जलपरी मजल-दरमजल करीत लातूर जिल्ह्यात आली.

सुव्यवस्थेसाठी बदलली वेळ..!
पाईपलाईनचे काम ताजे आहे. पाणी पडल्यानंतर ते खराब होऊ शकते. कामावर अंतिम हात मारण्याचे काम पहाटेपर्यंत सुरू होते. शिवाय, मध्यरात्रीच्या वेळी लातूरच्या रेल्वेस्थानकावर ही जलपरी आल्यावर उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदात बाधा येऊ नये, जास्तीत जास्त लोकांनी रेल्वेचे जंगी स्वागत करावे, यासाठी रेल्वेच्या आगमनाची वेळ बदलण्यात आली. त्यामुळेच लातूर जिल्ह्यात आगमन झालेल्या जलपरीला औसा रोड स्थानकावर थांबविण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Latur gets water 'Express'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.