लातूरच्या खासदारांना अपमानास्पद वागणूक प्रकरणी दोघांना केले निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 09:16 PM2017-07-19T21:16:55+5:302017-07-19T21:56:40+5:30

भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सदन कँटीनमधील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले

Latur MPs suspended for abusive behavior | लातूरच्या खासदारांना अपमानास्पद वागणूक प्रकरणी दोघांना केले निलंबित

लातूरच्या खासदारांना अपमानास्पद वागणूक प्रकरणी दोघांना केले निलंबित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भाजपाचे लातूरचे खासदार सुनील गायकवाड यांना अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी महाराष्ट्र सदन कँटीनमधील दोन कर्मचारी निलंबित करण्यात आले असून कँटीन मालकाला १० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे. महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी ही कारवाई केली आहे.
गायकवाड हे सोमवारी संसदेच्या अधिवेशनासाठी नवी दिल्लीला गेले होते. दुपारी ते महाराष्ट्र सदनमध्ये गेले. खासदार व आमदारांसाठीच्या कक्षामध्ये तेव्हा कोणाची तरी पार्टी सुरू होती. त्यामुळे ते सामान्य कक्षात गेले. तेव्हा काऊंटर मॅनेजरने त्यांना, कुठेतरी बसा असे सांगितले. त्यावर त्यांनी मी खासदार असल्याचे सांगितले. गायकवाड हे सरळ एका रिकाम्या टेबलाकडे गेले. मात्र एक वेटर तेथे आला व हा टेबल बुक असल्याचे त्याने सांगितले. खा. गायकवाड यांना वेटरने तेथे बसू दिले नाही. तब्बल अर्धा तास त्या टेबलाकडे कोणीही आले नाही. तरीही गायकवाड बसू देण्यात आले नव्हते. याविरोधात कँटीन प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी खा. गायकवाड यांनी अभिप्राय पुस्तिकेत केली होती.

या आधीही झाला होता वाद

2014 मध्ये रमजानच्या महिन्यात महाराष्ट्र सदनात एका मुस्लीम कर्मचा-याला बळजबरीने चपाती खायला लाऊन त्याचा रोजा मोडल्याचे प्रकरण झाले होते. महाराष्ट्र सदनात मराठी खासदारांना मिळणारी वागणूक, राहण्याची व खाण्यापिण्याची निकृष्ट दर्जाची सोय यामुळे संतापलेल्या शिवसेना खासदारांनी सदनातील कर्मचा-याला बळजबरीने चपाती भरवली होती. मात्र तो कर्मचारी मुसलमान होता व तेव्हा त्याचा रमजानचा उपवास सुरू असल्याने या प्रकरणी मोठा गदारोळ माजला होता. भाजप-शिवसेनेचे नवनियुक्त खासदार निवडून आल्यापासून नवीन महाराष्ट्र सदनात वास्तव्य करत होते. मात्र त्यांना तेथे चांगल्या सोयी-सुविधा दिल्या जात नव्हत्या. या गैरसोयींवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे खासदार महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांना वारंवार भेटण्याचा पयत्न करीत होते. मात्र, निवासी आयुक्तांकडून त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. एकदा मलिक यांनी त्यांना भेटण्याची वेळ दिली मात्र ते भेटलेच नाहीत. यामुळे त्यांच्यावरील राग कँटीनच्या मॅनेजरवर निघाला. जेवण नीट नसल्यामुळे सेनेचे खासदार राजन विचारे यांनी मॅनेजरला बोलावले आणि पोळी खावून दाखविण्यास सांगितले. त्याने पोळी खाल्ली नाही म्हणून विचारे यांनी स्वतः मॅनेजरच्या तोंडाला पोळी लावली. मात्र तो मुस्लीम असून त्याने रोजा ठेवला आहे याची माहिती त्यांना नव्हती. रोजाचा उपवास मोडल्या प्रकरणावरून प्रचंड गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्यावरून संसदेचे कामकाजही बंद पाडले होते.

Web Title: Latur MPs suspended for abusive behavior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.