स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 05:55 PM2019-06-18T17:55:06+5:302019-06-18T18:04:31+5:30

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे.

Latur needs water Amit Deshmukh | स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे : अमित देशमुख

Next

मुंबई - दुष्काळग्रस्त आणि पाण्याची तीव्र टंचाई असणारा जिल्हा म्हणून लातूर जिल्ह्याची ओळख आता केवळ राज्यातच नव्हे तर देशपातळीवरही झालेली आहे. लातूर मधील भीषण पाणी टंचाईचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमित देशमुख यांनी मंगळवारी मांडला. त्यानंतर, सरकारी आश्वासने आणि स्वप्नरंजन खूप झाले आता लातूरकरांना पाणी हवे, असे अमित देशमुख म्हणाले.

चार वर्षापसून लातूर जिल्ह्यातील जनता दुष्काळाच्या संकटात सापडली आहे. त्यामुळे, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणाबाजी नको, प्रत्यक्षात पाणी हवे आहेत. अशी मागणी अमित देशमुख यांनी केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) प्रश्नोत्तरेचा तासात पाण्या संदर्भातील चर्चा सुरू असतांना, सभागृहात लातूरच्या पाणी प्रश्नाची तीव्रता अमित देशमुख यांनी मांडली. रेल्वेने पाणी आणण्याचा अनुभव झाल्यांनतर वॉटरग्रीडचे स्वप्न दाखवले जात आहे. मात्र, वॉटरग्रीड संकल्पनेची प्रत्यक्षात अमलबजावणी व्हावी. ही फक्त निवडणुकीची घोषणा ठरू नयेत ही अपेक्षा असल्याचे अमित देशमुख म्हणाले.

२०१६ मध्ये दुष्काळग्रस्त लातूरच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियमित पाणी पुरवठा होईल असे आश्वासन दिले होते. मात्र, आजही लातूरकरांना महिन्यातून केवळ दोन वेळा पाणी मिळते. अमृत योजनेंतर्गत सूर असलेले काम १८ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित असताना, तीन वर्षानंतरही हे काम संथ गतीने सुरु असल्याची कैफियत अमित यांनी सभागृहात मांडली. अमृतयोजनेचे काम महिन्याभरात पूर्ण होईल असे आश्वासन फडणीस यांनी दिले असलेतरीही, उजणीच्या पाण्याबाबत मात्र मौन बाळगले, असल्याची टीका अमित देशमुख यांनी केली.

Web Title: Latur needs water Amit Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.