ई-लर्निगचा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शुभारंभ

By admin | Published: August 24, 2014 01:18 AM2014-08-24T01:18:12+5:302014-08-24T01:18:12+5:30

टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने शनिवारी शहरातील तीन माध्यमिक शाळांमध्ये ई- लर्निग प्रणालीचा शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला.

Launch of E-Larning School Education Minister Rajendra Darda | ई-लर्निगचा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शुभारंभ

ई-लर्निगचा शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते शुभारंभ

Next
औरंगाबाद : टाटा उद्योग समूहाच्या सहकार्याने शनिवारी शहरातील तीन माध्यमिक शाळांमध्ये ई- लर्निग प्रणालीचा शुभारंभ राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते करण्यात आला. राजर्षी शाहू विद्यालय, बळीराम पाटील विद्यालय व स.भु. विद्यालयातील संगणक प्रयोगशाळेत ई- लर्निग सुविधेचे त्यांनी उद्घाटन केले. 
 राज्यात आठ हजार अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये शालेय शिक्षण विभागाने संगणक प्रयोगशाळा (आयसीटी लॅब) उभारल्या आहेत. विद्याथ्र्याना संगणकाच्या माध्यमातून ई- लर्निग पद्धतीचा वापर करून शिक्षण दिल्यास कठीण विषयही सहजपणो समजू शकतो. ही गोष्ट लक्षात घेऊन शालेय शिक्षण विभागाने टाटा उद्योग समूहाच्या ‘टाटा क्लासेज’बरोबर सामंजस्य करार केला. 
त्याअंतर्गत राज्यात सर्व ठिकाणी ई- लर्निग कन्टेंट पुरविला जाणार आहेत. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर राज्यात दोनशे माध्यमिक शाळांमध्ये ई- लर्निग प्रणाली देण्यात येणार आहे. त्यापैकी शंभर शाळा औरंगाबाद, तर शंभर शाळा पुणो जिलतील निवडण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून टाटा क्लासेजतर्फे  राज्यातील पहिल्या तीन शाळांमध्ये हा शुभारंभ झाला. येत्या दोन महिन्यांत सर्व 1क्क् माध्यमिक शाळांमध्ये ही व्यवस्था उभी केली जाणार आहे. मुंबईत बसून या प्रणालीचा किती वापर शाळा करतात, हे टाटा क्लासेजला त्यांच्या डॅश बोर्डावर पाहता येणार आहे. 
राज्यात 1 लाख 3 हजार शाळा असून त्यामध्ये 2 कोटी 18 लाख विद्यार्थी पहिली ते 12 वीर्पयतचे शिक्षण घेत आहेत. त्यांना आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण दिल्यास ते गणित व विज्ञान विषयांचे सिद्धांत सहज समजू शकतील. या सोप्या पद्धतीने कठीण विषय सहज सोपा होतो, असेही ते म्हणाले. 
सिडकोतील राजर्षी शाहू विद्यालयात आय.सी.टी. संगणक प्रयोगशाळेत टाटा ई- कन्टेंटचा शुभारंभ राजेंद्र दर्डा यांनी संगणकाची कळ दाबून केला. यावेळी भाग्यश्री परदेशी या शाळकरी मुलीशी त्यांनी संवाद साधून आस्थेवाईकपणो चौकशी केली. 
प्राचार्य शाहूराज मुगळे, प्रा. गोपाळराव बिराजदार यांनी यंत्रणोची माहिती दिली. त्याचप्रमाणो बळीराम पाटील विद्यालयातही या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नितीन राठोड यांची उपस्थिती होती. 
सरस्वती भुवन विद्यालयास राजेंद्र दर्डा यांनी भेट देऊन येथील संगणक प्रयोगशाळेतील ई- लर्निग सुविधेचे उद्घाटन केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनकर बोरीकर, दिनेश वकील, ज्ञानप्रकाश मोदाणी, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांची उपस्थिती होती. ई- कन्टेंट उपक्रमाच्या माहिती पुस्तिकेचे राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते प्रकाशन व वितरण करण्यात आले.
शिक्षण सहसंचालक दिनकर पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी भगवान सोनवणो, बाळासाहेब पवार, पारस बोथरा,  विलास केवट, मंडळाचे सदस्य एस.पी. जवळकर, मनोज पाटील, किरण पाटील, इरफान सौदागर आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Launch of E-Larning School Education Minister Rajendra Darda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.