सुविधादालन उपक्रम सुरू

By admin | Published: May 18, 2016 01:31 AM2016-05-18T01:31:40+5:302016-05-18T01:31:40+5:30

‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे.

Launch of Excellence Program | सुविधादालन उपक्रम सुरू

सुविधादालन उपक्रम सुरू

Next


बारामती : नागरिक आणि प्रशासनाच्या समन्वयासाठी ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रम कौतुकास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, नगरपालिका प्रशासनाने यापूर्वीच सुविधादालन उपक्रम राबविला आहे. त्यातून नागरिकांच्या समस्यांची माहिती घेण्याचा उद्देश आहे, असे नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी सांगितले.
बारामती येथे ‘लोकमत आपल्या दारी’ कार्यक्रमात ते बोलत होते.
जगताप म्हणाले, सुमारे ५५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणाऱ्या शहराचे तीनशे ते सव्वातीनशे कोटींचे बजेट आहे. यातून शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. वाढीव हद्दीतील रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. पाणीपुरवठ्याच्या सक्षम नियोजनामुळे२ लाख लिटर दैनंदिन पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळेल. ८५ टक्के भूमिगत गटारांचे काम पूर्ण केले आहे. मागेल त्याला ‘ड्रेनेज’ देणार आहे. दलितवस्तीसाठी अधिकचा निधी उपलब्ध केला जाईल. बारामती शहरातील खराब पाणी झाडांना देऊन उर्वरित पाणी शेतकऱ्यांना देण्यात येईल. शहरात तालुकास्तरावर प्रथमच ‘ओपन जिम’चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे. प्लॅस्टिक न वापरण्याची नागरिकांनी प्रतिज्ञा करावी.
ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले म्हणाले, सकारात्मक समन्वयासाठी ‘लोकमत’चा विविध उपक्रमांतून नेहमीच पुढाकार असतो. शहरात नगरपालिका प्रशासनाने समतोल विकास साधला आहे. पाणी, वीज आदी मूलभूत सुविधा शहरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
‘लोकमत’मुळे रेशनिंग दुकानातील भ्रष्टाचार उघडकीस आल्याचे सतीश गावडे यांनी नमूद केले. बोगस कागदपत्रे उघडकीस आली; त्यामुळे संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आल्याचे ते म्हणाले.
>गळती थांबवावी : प्रशासनाला आवाहन

माजी उपनगराध्यक्ष संजय संघवी म्हणाले, गेली ६ वर्षे जुन्या साठवण तलावातून कोट्यवधी लिटर पाण्याची गळती झाली आहे. नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालून गळती थांबविणे गरजेचे आहे. राज्यात तीव्र दुष्काळ असताना पाण्याची गळती होणे योग्य नाही. नवीन तंत्रज्ञानाने कोयनेतील गळती थांबविण्यास यश आले; त्यामुळे या तलावातील गळती थांबविण्यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. गळतीमुळे कोट्यवधी लिटर पाणी वाया गेले. त्यासाठी संबंधित ठेकेदारावर नगरपालिका प्रशासनाने कोणती कारवाई केली? शहरातील दाट लोकवस्तीच्या ठिकाणी रस्ते होणे आवश्यक आहे. निर्जन ठिकाणी रस्ते झालेले नाहीत.
हरिकृपानगर परिसरातील रस्त्यांना न्याय देण्याची मागणी आहे. यावर नगराध्यक्ष जगताप यांनी, हरिकृपानगरच्या रस्त्यांची कामे करण्याचे आश्वासन दिले. मंगळवारी (दि. १७) ‘लोकमत आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत संजय संघवी यांच्या तोंडी प्रसिद्ध झालेले वक्तव्य वस्तुत: माजी नगरसेवक विजय गव्हाळे यांचे होते.

Web Title: Launch of Excellence Program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.