'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड'चं कलर्स वाहिनीवर प्रक्षेपण
By admin | Published: February 25, 2017 08:27 PM2017-02-25T20:27:59+5:302017-02-25T20:32:06+5:30
कलर्स मराठीवर 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता 'लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड' सोहळ्याचं प्रक्षेपण होणार आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या कॉटनकिंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्र मोस्ट स्टायलिश अॅवॉर्ड सोहळ्याचं प्रक्षेपण टीव्हीवर पाहायला मिळणार आहे. कलर्स मराठीवर 26 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजता या सोहळ्याचं प्रक्षेपण होणार आहे.
तसंच एबीपी माझावर 27 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान हा अॅवॉर्ड सोहळा पाहता येणार आहे. दुपारी 12.30 आणि 4.30 वाजता प्रसारित होणा-या 'घे भरारी' कार्यक्रमात या अॅवॉर्ड सोहळ्यातील क्षण पाहण्यास मिळणार आहेत. हा अॅवॉर्ड सोहळा अनेक मराठी आणि हिंदी तारे-तारकांनी गाजवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार समारंभात विविध क्षेत्रांमधील मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटीजना अॅवॉर्ड देण्यात आले.
३१ जणांना लोकमतने महाराष्ट्राज स्टायलिश अॅवार्डने गौरविले होते. अमृता फडणवीस याही त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखल्या जातात. त्यामुळे त्याही विजेत्या होत्या. पण त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अॅवार्ड स्वीकारला. प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना स्टायलिश जीवनगौरव अॅवॉर्ड देण्यात आला, तेव्हा मला आयुष्यात आणखी खूप काही करायचे आहे, असे ते गंमतीने म्हणाले.
आदित्य ठाकरे यांना अॅर्वार्ड दिल्यानंतर त्यांची जी छोटेखानी मुलाखत ऋषि दर्डा यांनी घेतली. त्यात त्याने स्टाईलविषयीच्या आपल्या कल्पना सांगितल्या आणि या आगळ्या अॅवॉर्डबद्दल लोकमतचे कौतुकही केले. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर यांना त्यांच्या स्टाइलविषयी बोलते केले. क्रिकेटव्यतिरिक्त हा माझा पहिला अॅवॉर्ड आहे, असे अजिंक्य रहाणे म्हणाला. या अॅर्वार्डमुळे मला स्टायलिश राहावे लागेल, असेही तो हसतच म्हणाला. सुयश टिळक व क्रांती रेडकर यांनी या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.
- लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त करताना, दिग्गजांच्या उपस्थितीबद्दल त्या सर्वांचे आभार मानले. लोकमतवरील प्रेमापोटीच तुम्ही आला आहात, असे ते म्हणाले. लोकमत हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर या देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक आहे.