मुंबईहून ऑस्ट्रेलियाला रवाना केले मेट्रोचे कोच, निर्यातीचा शुभारंभ
By admin | Published: January 29, 2016 01:38 PM2016-01-29T13:38:14+5:302016-01-29T13:38:14+5:30
बडोद्यामध्ये बांधण्यात आलेले मेट्रोचे कोच प्रथमच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमधून हे कोचेस नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती सरकारी अधिका-यांनी दिली
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - बडोद्यामध्ये बांधण्यात आलेले मेट्रोचे कोच प्रथमच ऑस्ट्रेलियाला निर्यात करण्यात आले आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टमधून हे कोचेस नुकतेच ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याची माहिती सरकारी अधिका-यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने मेट्रोच्या ४५० कोचेसची ऑर्डर भारतात दिली असून त्यापैकी पहिले सहा कोच समुद्रमार्गे रवाना झाले आहेत. प्रत्येक कोच ७५ फूट लांबीचा व ४६ टन वजनाचा असून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अद्ययावत यंत्रणेने हे कोच व्यवस्थित बोटीवर चढवण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली आहे. विशेष म्हणजे, अन्य बंदरांमध्ये असा महत्त्वाचा माल बोटीवर चढवण्यासाठी खासगी कंपन्यांची मदत घेतली जाते, परंतु मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये हे काम सरकारी यंत्रणेनेच यशस्वीरीत्या केल्याचे सांगण्यात आले आहे.