लोणार महोत्सवातून वैज्ञानिक पर्यटनाला चालना
By Admin | Published: February 20, 2017 03:58 AM2017-02-20T03:58:09+5:302017-02-20T03:58:09+5:30
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व स्थानिक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार सरोवर येथे ३ ते ५ मार्चदरम्यान लोणार
लोणार (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, जिल्हा प्रशासन व स्थानिक नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार सरोवर येथे ३ ते ५ मार्चदरम्यान लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटकांसाठी ही एक वैज्ञानिक, ऐतिहासिक पर्यटनाची पर्वणीच ठरणार आहे.
उल्कापाताने तयार झालेल्या लोणार सरोवरातील जैवविविधता पर्यटकांच्या नजरेत यावी, तसेच वैज्ञानिक पर्यटनास महत्त्व प्राप्त व्हावे, या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दरम्यान विविध साहसी क्रीडा प्रकारांचे आयोजनही होणार आहे. लोणार महोत्सवादरम्यान पर्यटकांच्या सुविधेसाठी विविध प्रकारची तयारी प्रशासनाकडून केली जात आहे. महोत्सवादरम्यान लांबपल्ल्याच्या बससेवा सुरू करण्यात येणार आहेत.
विदर्भातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी लोणार सरोवर महोत्सवाचे आयोजन केले आहे.
- डॉ. नीलेश अपार, उपविभागीय अधिकारी, मेहकर