डॉक्टरांच्या रक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची!

By Admin | Published: March 27, 2017 04:34 AM2017-03-27T04:34:46+5:302017-03-27T04:34:46+5:30

अलीकडच्या काळात निवासी डॉक्टरना झालेली मारहाण व त्यानंतर झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉक्टर-रुग्ण

Law enforcement is very important for the protection of doctors. | डॉक्टरांच्या रक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची!

डॉक्टरांच्या रक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची!

googlenewsNext

मुंबई : अलीकडच्या काळात निवासी डॉक्टरना झालेली मारहाण व त्यानंतर झालेल्या निवासी डॉक्टरांच्या संपामुळे डॉक्टर-रुग्ण संबंधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे नमूद करून डॉक्टरांच्या रक्षणासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची योग्य प्रकारे अंमवबजावणी झाली पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केले.
पद्मविभूषण डॉ. नागेश्वर रेड्डी यांना राज्यपालांच्या हस्ते रविवारी धन्वंतरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. धन्वंतरीची मूर्ती, सुवर्णपदक आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
राज्यपाल म्हणाले , डॉक्टर व रुग्णांचे नाते परस्पर विश्वासाचे असले पाहिजे. डॉक्टरांनी रुग्णांशी तसेच त्यांच्या संबंधितांशी सहानुभूतीपूर्वक वागले पाहिजे. कित्येकदा संवादाच्या अभावामुळे किंवा तुटक संवादामुळे डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात, असे सांगून संवाद आणि रुग्णांप्रति सहानुभूती यातून विश्वासाचे नाते निर्माण होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणासोबत ‘मानव्यशास्त्र’ हा विषय शिकविण्याबाबतदेखील विचार व्हावा अशी त्यांनी सूचना केली.
या वेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी केंद्रीय
गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. नागेश्वर रेड्डी, धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे डॉ. बी.के. गोयल, धन्वंतरी फाउंडेशनचे सचिव डॉ. जिवराज शहा, वैद्य सुरेश चतुर्वेदी, डॉ. लेखा पाठक, डॉ. टिष्ट्वंकल संघवी आदी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, कुठल्याही वैद्यकीय उपचारांची यशस्विता ही डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यावर अवलंबून असते. त्यासाठी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात परस्परांविषयी विश्वास महत्त्वाचा असतो. डॉक्टरांनी त्यांच्या कौशल्याचा उपयोग रुग्णांच्या वेदना कमी करण्यासाठी केला पाहिजे. सध्याच्या निवासी डॉक्टरांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन म्हणाले की, डॉ. रेड्डी यांना पुरस्कार दिल्याने धन्वंतरी पुरस्काराचे मूल्य वाढले आहे. वैद्यकीय क्षेत्रात वैद्यकीय कौशल्यासोबत संवादही आवश्यक असतो. तरुण डॉक्टरांनी डॉ. रेड्डी यांचा आदर्श ठेवून काम करायला हवे. (प्रतिनिधी)

डॉ. रेड्डी यांचे योगदान महत्त्वाचे
डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी गॅस्ट्रोइंट्रोलॉजी आणि एन्डोस्कोपी क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. त्यांचा अभ्यास आणि संशोधनामुळे हैदराबाद येथे जागतिक दर्जाचे गॅस्ट्रोइंट्रोलॉजीचे केंद्र उभे राहू शकले. त्यांच्या प्रयत्नामुळे सामान्य माणसांना किफायतशीर दरात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकल्याचेही राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अधोरेखित केले.

ंवैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी तेथेच व्यवसाय करण्याचा सल्ला दिला होता, मात्र मी भारतात येऊन संशोधन करण्याचा निर्णय घेतला. हैदराबाद येथे येऊन गॅस्ट्रोइंट्रोलॉजीचे केंद्र उभारले. काही दिवसांपूर्वी त्याच प्राध्यापकांनी पत्र लिहून माझा निर्णय बरोबर होता, असे सांगितले यातच सर्व काही आले. भारतात वैद्यकीय संशोधनासाठी प्रचंड संधी आहेत. - डॉ. नागेश्वर रेड्डी

Web Title: Law enforcement is very important for the protection of doctors.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.