‘लॉसह सीए’चे पेपर एकाच दिवशी
By admin | Published: April 4, 2017 06:07 AM2017-04-04T06:07:46+5:302017-04-04T06:07:46+5:30
लॉच्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने उशिरा लावल्याने केटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी
मुंबई : लॉच्या परीक्षांचा निकाल विद्यापीठाने उशिरा लावल्याने केटी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. या मागणीचा विचार करून विद्यापीठाने केटी परीक्षा पुढे ढकलून एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ठेवली. त्यामुळे
मेपर्यंत चालणारी ही परीक्षा
आणि सीएच्या परीक्षांचे पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थी संभ्रमावस्थेत आहेत.
परीक्षा झाल्यानंतर ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर करणे बंधनकारक आहे. पण प्रत्येक वेळी विद्यापीठात होणाऱ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. ५ एप्रिलपासून लॉची केटी परीक्षा घेण्यात येणार होती. पण आता ही परीक्षा २७ एप्रिल ते ८ मे दरम्यान घेण्यात येणार आहे. तर सीएची परीक्षा २ ते १७ मे या दरम्यान होईल. २, ४ आणि ८ मे असे तीन दिवस लॉ व सीएचे पेपर एकाच दिवशी आहेत.
सीएचा एफआर हा पेपर २ मे रोजी असून त्याच दिवशी लॉचा काँट्रॅक्ट पेपर आहे. सीएचा ४ मे रोजी एफएमचा पेपर असून लॉचा कन्झ्युमर प्रोटेक्शन लॉ पेपर आहे. ८ मे रोजी लॉचा लिगल लँग्वेजचा पेपर असून सीएचा लॉ या विषयाचा पेपर आहे.
एकूण तीन पेपर एकाच दिवशी आहेत. दोन्ही परीक्षांचे शुल्क भरल्यामुळे तसेच अभ्यासासाठी कमी वेळ मिळणार असल्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने लॉच्या फायनल परीक्षांनंतर केटी परीक्षा ठेवाव्यात. जेणेकरून सीएच्या परीक्षांमध्ये या परीक्षा येणार नाहीत आणि विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांचा अभ्यास करण्यास वेळ मिळेल, अशी
मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे
अध्यक्ष सचिन पवार यांनी केली
आहे. (प्रतिनिधी)