वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 10:50 PM2017-09-24T22:50:17+5:302017-09-24T22:50:34+5:30

सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

A lawyer has been abducted for three months by a woman abducted, a journalist and a lawyer in 11 accused | वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश

वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश

Next

गोंदिया : सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गोंदिया शहराच्या बसंतनगर बालाघाट रोड रस्त्यावरील एका ३६ वर्षाच्या महिला वकीलाने  सरकारी वकील होण्यासाठी अर्ज दाखल केला होता. तर त्यांच्या स्पर्धेत अ‍ॅड. तोलानी हे सुद्धा होते. तोलानी पेक्षा त्या कामाकाजात वरिष्ठ असल्यामुळे त्यांची निवड निश्चित होती. हे पाहून अ‍ॅड.तोलानी व पिडित वकील महिलेसोबत वैन्यमस्य असलेले पत्रकार इंद्रकुमार राही या दोघांनी कट रचला. त्यांच्या अपहरणाची सुपारी जुल्फीकार जब्बार गणी
ऊर्फ छोटू याला दिली. त्याने आपल्या साथीदारांना घेवून ७ जून २०१७ च्या सकाळी १०.३० वाजता पिडित महिला न्यायालयात जात असताना न्यायालयाच्या बाहेरुनच दिवसाढवळ्या त्यांना उचलले. या प्रकरणात जुल्फीकार जब्बार गणी, प्रकाश ताराचंद तोलाणी  (३४), इंद्रकुमार एच. राही (५५), बाबा जब्बार गणी (४०), गोलू गणी (३०), आशिष मिश्रा (४०), अन्नु करियार (३५), अक्की अग्रहरी (३०) व इतर तीन अशा ११ जणांविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात रविवारी (दि.२४) भादंवि कलम ३७६ (२) (एन) ३६३, ३६४ अ, ३४२, ३४, १२० ब अन्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे ७ जून पासून १८ सप्टेंबरपर्यंत तिला अज्ञात स्थळी डांबून ठेवले.आरोपी जुल्फीकार जब्बार गणी याने त्या वकील महिलेवर बळजबरी केली. तसेच सर्व आरोपींनी ठार मारण्याची धमकी दिली. परंतु आरोपींची नजर चोरुन सदर महिला १८ सप्टेंबर रोजी पळून गोंदियात आली. या संदर्भात गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र आरोपीला अटक झाली नव्हती. तपासुन पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक विवेक नार्वेकर करीत आहेत.

Web Title: A lawyer has been abducted for three months by a woman abducted, a journalist and a lawyer in 11 accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.