‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांचे उपोषण मागे
By Admin | Published: February 13, 2016 01:58 AM2016-02-13T01:58:19+5:302016-02-13T01:58:19+5:30
‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी गोरेगावच्या चित्रनगरीतील उपाहारगृहासाठी छेडलेले उपोषण दोन दिवसांनंतर मागे घेतले आहे. प्रशासनाने त्यांना करारवाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
मुंबई : ‘उचल्याकार’ लक्ष्मण गायकवाड यांनी गोरेगावच्या चित्रनगरीतील उपाहारगृहासाठी छेडलेले उपोषण दोन दिवसांनंतर मागे घेतले आहे. प्रशासनाने त्यांना करारवाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.
गायकवाड यांच्या उपोषणाला विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पाठिंबा दिला होता. याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच लक्ष घालत गायकवाड यांच्या हॉटेलवरील कारवाईला स्थगिती दिली. शिवाय याविषयीचा संदेश सांस्कृतिक विभागाकडे पाठवून कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)