“शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 06:54 PM2024-06-24T18:54:08+5:302024-06-24T18:54:55+5:30

Laxman Hake News: या बैठकीला कोणकोण अपेक्षित आहे, याची एक यादीच लक्ष्मण हाके यांनी समोर ठेवली.

laxman hake said sharad Pawar should look into maratha obc reservation issue | “शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके

“शरद पवारांनी मराठा-ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात लक्ष घालावे, सगळ्यांची एक बैठक घ्यावी”: लक्ष्मण हाके

Laxman Hake News: ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस चांगलाच गाजताना पाहायला मिळत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, यासाठी आंदोलनात उतरलेले लक्ष्मण हाके आणि काही झाले तरी ओबीसीतूनच आरक्षण हवे, असे म्हणणारे मनोज जरांगे पाटील आमनेसामने आल्याचा पाहायला मिळत आहे. दोघेही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. यातच आता मराठा आणि ओबीसी आंदोलनाच्या प्रश्नात शरद पवार यांनी लक्ष घालावे, अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले की, ओबीसींनी कधी दंगली घडवल्या नाहीत. ओबीसींचा तो इतिहास नाही. शरद पवार यांनी सर्वपक्षीयांची एक बैठक बोलवावी. आमदार-खासदारांची बैठक बोलवावी. सगळ्या जबाबदार लोकांची बैठक बोलवावी. सामाजिक शास्त्रज्ञांची बैठक बोलवावी. इतिहास तज्ज्ञांची बैठक बोलवावी. प्रत्येक विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक बोलवावी. सगळ्या लोकांना एकत्र बसवावे आणि शरद पवार यांना सगळे लोक रिस्पेट करतील. आऊट ऑफ द जाऊन आदर देतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 

शरद पवार यांनी ही भूमिका घेतली तर...

शरद पवार यांनी ही भूमिका घेतली तर मुख्यमंत्री येतील. विरोधी पक्षनेते येतील. वेगवेगळ्या पक्षाचे प्रमुख येतील. विधानसभा, विधान परिषदमधील लोकप्रतिनिधी येतील. लोकसभा, राज्यसभेतील लोकप्रतिनिधी येतील. याचा अभ्यास करणारे लक्ष्मण माने यांच्यासारखे लोक घ्यावे लागतील. छोट्या छोट्या घटकांतील लोक घ्यावे लागतील. लक्ष्मण गायकवाड, मच्छिंद भोसले यांना बोलावून घ्यावे लागेल. त्यांच्या वेदना समजून घ्यावा लागतील, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, मनोज जरांगे यांना मंडल आयोग कधी निर्माण झाला, काही माहिती नाही. घटनात्मक अधिकार असलेल्या मंडल आयोगावर बोलणे म्हणजे पारावरच्या गप्पा आहेत का? असा टोला लक्ष्मण हाके यांनी लगावला. तसेच मनोज जरांगे यांनी मंडल आयोगाचा अभ्यास करावा, जी गोष्ट कधी होणे शक्य नाही, ती मागणी ते करत आहेत. आरक्षण हे खिरापत वाटण्याचा कार्यक्रम नाही. व्हीजेएनटी आणि ओबीसींचे आरक्षण एकच असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.

Web Title: laxman hake said sharad Pawar should look into maratha obc reservation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.