“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 03:53 PM2024-07-24T15:53:01+5:302024-07-24T15:56:31+5:30

Laxman Hake News: शरद पवार आणि मनोज जरांगेंची समांतर लाईन आहे. शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, तेच जरांगे पकडतात, अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली.

laxman hake slams manoj jarange patil and said he not contest elections | “लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

“लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही, ते फक्त...”; लक्ष्मण हाकेंचे टीकास्त्र

Laxman Hake News:मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आमरण उपोषण मनोज जरांगे यांनी स्थगित केले आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला पुन्हा एकदा १३ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. यातच लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा मनोज जरांगे यांच्यावर टीका केली असून, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाहीत, माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या, असे आव्हान लक्ष्मण हाकेंनी दिले आहे. 

ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी काढलेली ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश जामखेड येथे दाखल झाली. जनआक्रोश यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ओबीसींचा हा जनाक्रोश आम्ही नेटाने सरकारपर्यंत पोहचणार आहोत. मुख्यमंत्री शिंदेंनी फक्त मराठा समाजाचे लाड पुरवण्याचे काम सुरू केले आहेत, अशी टीका नवनाथ वाघमारे यांनी केली. लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे यांच्या निवडणूक लढवण्याच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना निशाणा साधला.

लिहून घ्या, मनोज जरांगे निवडणूक लढू शकत नाही

मनोज जरांगे यांची लढाई आरक्षणाची नसून वर्चस्वाची आहे. जरांगे पाटील हे निवडणूक लढू शकत नाहीत, हे माझ्याकडून पेपरवर लिहून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेखाली बसून लेकी बाळांना शरमेने मान खाली घालण्याची वेळ येईल अशी भाषा वापरावी. मनोज जरांगे पाटील यांनी आई बहिणीवर शिव्या घालतात, ही काही निवडणूक लढवण्याची साधन आहेत का, अशी विचारणा लक्ष्मण हाके यांनी केली.

मनोज जरांगे यांना ओबीसींमध्ये फूट पाडायची आहे

मनोज जरांगे यांना ओबीसींमध्ये फूट पाडायची आहे. त्यांना धनगर आरक्षणाबाबत कुठलीही आपुलकी नाही. शरद पवार आणि जरांगे यांची समांतर लाईन आहे. शरद पवार बारामतीमध्ये जे वक्तव्य करतात, त्याचीच लाईन जरांगे पकडतात. ओबीसीमध्ये साडे तीन टक्के आरक्षण धनगर समाजाला मिळते. सर्वाधिक वाटा असतानाही आम्ही ओबीसीच्या आरक्षणाबाबत का लढू नये, असे हाके म्हणाले.

दरम्यान, ज्या मागण्या मान्य होणार नाहीत, अशा मागण्या घेऊन ते आंदोलन करत आहेत. त्यांना आणि त्यांना सल्ला देणाऱ्यांना दोघांनाही माहिती आहे. महापुरुषांच्या प्रतिमेसमोर बसून शिवराळ भाषा वापरणारा हा माणूस तारीख पे तारीख देऊ शकतो. मनोज जरांगे दुसरे काही करू शकत नाहीत, या शब्दांत लक्ष्मण हाकेंनी हल्लाबोल केला.

 

Web Title: laxman hake slams manoj jarange patil and said he not contest elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.