सायन्स एक्स्प्रेस रायगडच्या राेहा येथे थांबविण्यात लाेकमतला यश
By admin | Published: July 14, 2017 05:11 PM2017-07-14T17:11:36+5:302017-07-14T17:11:36+5:30
विज्ञान प्रसाराकरीता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हाेती घेण्यात आला आहे.
Next
>जयंत धुळप / ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. 14 - विज्ञान प्रसाराकरीता केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि विज्ञान मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने सायन्स एक्स्प्रेस हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प हाेती घेण्यात आला आहे. 16 डब्यांची ही विशेष विज्ञान ट्रेन काेकणात केवळ रत्नागीरी व मुंबई थांबणार हाेती. परिणामी रायगड मधील विद्यार्थी आणि विज्ञान जिज्ञासूं या सायन्स एक्स्प्रेसच्या बाैद्धीक लाभास वंचित राहाणार हाेते. ही बाब गुरुवारी लाेकमत रायगड कार्यालयाने केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ईमेल करुन लक्षात आणून देवून, ही ट्रेव रायगड मध्ये एक दिवस थांबवीण्याची विनंती केली हाेती. लाेकमतची ही विनंती माऩ्य करुन मंगळवार दि.18 जुलै 2017 राेजी सायन्स एक्स्प्रेस रायगडवासीयांकरिता राेहा स्थानकात थांबविण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री प्रभू यांचे कार्यालयीन सचिव सुधीर भालेराव यांनी लाेकमतला फाेन करुन दिली आहे.
दरम्यान सायन्स एक्स्प्रेसचा 18 जूलै 2017 राेजीचा संपूर्ण कार्यक्रम लाेकमत कार्यालयास सत्वर पाठविण्यात येत असल्याचे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचे अधिकारी साकेत मिश्रा यांनी कळविले आहे.
पूर्व नियाेजित कार्यक्रमानुसार ही सायन्स एक्सप्रेस रत्नागिरी येथे 14 ते 17 जुलै 2017 या कालावधीत थांबून थेट मुंबईस जावून 19 ते 22 जुलै रोजी छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) येथे थांबणार आहे. मात्र आता यात बदल करुन ती रायगड मध्ये राेहा रेल्वे स्थानकावर 18 जूलै राेजी थांबणार असल्याने रायगडवासीयांना या अनन्य साधारण सायन्स एक्झिबीशनचा लाभ घेता येणार आहे. सायन्स एक्स्प्रेस पाहाण्याकरीता काेणतेही शुल्क नाही.
आॅक्टाेबर 2007 मध्ये भारत भ्रमणास प्रारंभ केलेल्या या 16 वातानूकूलीत डब्यांच्या सायन्स एक्स्प्रेसने आता पर्यंत 1746 दिवसात 1 लाख 56 हजार किमी प्रवास केला आहे. या दरम्यान देशातील 507 रेल्वे स्थानकांवर 1 काेटी 68 लाख विज्ञान जिज्ञासू व विद्यार्थ्यांनी तिचा लाभ घेतला आहे. सर्वाधिक दर्शक संख्या लाभलेल्या सायन्स एक्स्प्रेसची लीमका बूक आॅफ वर्ल्ड रेकाॅर्ड मध्ये 12 वेळा नाेंद झाली असल्याची माहिती भारतिय रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.