लक्ष्मी रस्त्याला घेऊ द्या मोकळा श्वास!

By admin | Published: May 16, 2016 01:07 AM2016-05-16T01:07:01+5:302016-05-16T01:07:01+5:30

पुण्याच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू असणारी जीवनवाहिनी म्हणजेच लक्ष्मी रस्ता

Laxmi take the road to breathe freely! | लक्ष्मी रस्त्याला घेऊ द्या मोकळा श्वास!

लक्ष्मी रस्त्याला घेऊ द्या मोकळा श्वास!

Next

निलेश बुधावले,

पुणे-पुण्याच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनाचा केंद्रबिंदू असणारी जीवनवाहिनी म्हणजेच लक्ष्मी रस्ता. सध्या हा रस्ता सार्वजनिक परिवहनाची कमतरता, वाहतूककोंडी, स्वास्थ्य, स्वच्छता व आरोग्यविषयक उपाययोजनांचा अभाव, अरुंद पदपथावरील कोंडी, पार्किंगची कमतरता यांसारख्या समस्यांनी व्यापला आहे.
या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज आॅफ आर्किटेक्चर या महाविद्यालयाच्या आशिक जैन, गौरव शहा, सांची सोळंखी, स्वरदा वैद्य, तेजल नहार या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्याला मोकळा श्वास घेण्यासाठी व उपलब्ध वास्तूंचा ठेवा पुणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध करून देण्यासाठी एका सुटसुटीत आराखड्याचे नियोजन केले आहे.
या आराखड्याचे नियोजन फक्त लक्ष्मी रस्त्यासाठी नसून, एकूणच शहरातील
वाहतुकीचा गुंता सोडविण्याचा
अभ्यासपूर्ण प्रयत्न आहे.
लक्ष्मी रस्त्याची उकल करून, हा रस्ता अधिक सुसह्य प्रवाससुलभ, व्यापारसुलभ करण्याचा हा पथदर्शी प्रयोग आहे. शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या नागरीकरणाचा वेग आणि त्यावरच्या उपाययोजना यामध्ये प्रमाणभूत समन्वय आणण्याचा हा प्रकल्प म्हणजे, एक सकारात्मक पाऊल ठरेल.
।पहिला टप्पा
रस्त्याच्या एकूण रुं दीचे दोन भाग केले आहेत. प्रत्येक लेन ३.२५ मी. रुंद आहे व बाकी उरलेली जागा फक्त पादचाऱ्यांकरिता दिली आहे. तसेच, पथारीवाल्यांचे पुनर्वसन न करता या उरलेल्या जागेत रस्त्याला लागून असलेल्या १.५मी.चा पट्टा पथारीवाल्यांसाठी नेमला गेलेला आहे. अशा प्रकारे सर्वांत जास्त जागा पादचाऱ्यांना कशी मिळेल, हा हेतू आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतूक कमी करून पहिल्या टप्प्यात २ लेन (१ लेन सार्वजनिक परिवहनासाठी व उर्वरित वाहतुकीसाठी ) असून, दुसऱ्या टप्प्यात १ लेन (फक्त सार्वजनिक परिवहनासाठी) ठेवण्यात येईल.
।दुसरा टप्पा
एकूण रस्त्याच्या रुंदीपैकी फक्त १ लेन (३.२५मी) आणि ती फक्त सार्वजनिक परिवहनासाठी. उर्वरित रस्ता पादचाऱ्यांकरिता ज्यामध्ये नियोजनबद्ध पादचारीमार्गाचा प्रस्ताव असेल. या प्रकल्पाच्या माध्यमातून शहराचा प्रमुख व्यापारी रस्ता शहराच्या उर्वरित भागाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे सुलभपणे जोडण्याचा प्रयास आहे. मुख्य लक्ष्मी रस्ता त्याला मिळणारे जोडरस्ते व आजूबाजंूचे समांतर रस्ते, पादचारी रस्ते, गर्दीच्या वेळा, गर्दीचे प्रवाह, पार्किंग व्यवस्था वाहतुकीची घनता आणि रस्त्यावरील अडथळे, प्रासंगिक व स्थावरात्मक अडथळे यांचा बारकाईने अभ्यास करून या रस्त्याला अधिक प्रवाही व जनसुलभ करण्याचा प्रयास या प्रकल्पात करण्यात आला आहे.

Web Title: Laxmi take the road to breathe freely!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.