मुंबई पालिकेत एलबीटीला सेनेचा विरोध
By admin | Published: December 22, 2014 04:53 AM2014-12-22T04:53:48+5:302014-12-22T04:53:48+5:30
महापालिकेत एलबीटीला शिवसेनेचा विरोध असून, नाक्यावरील जकात चोरीवर कारवाईची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात केली आहे
मुंबई : महापालिकेत एलबीटीला शिवसेनेचा विरोध असून, नाक्यावरील जकात चोरीवर कारवाईची मागणी शिवसेनेने मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
मुंबई महापालिकेच्या तिजोरीत थेट भर टाकणारी कोणतीही करप्रणाली शासनाने उभारलेली नाही. मुंबईत एलबीटी लागू केल्यास प्रत्येक वेळी पालिकेला शासनाकडून पैसे कधी मिळतील, याचीच वाट पाहावी लागेल. सध्या पालिकेला जकातीच्या माध्यमातून दरवर्षी ६ हजार कोटी रु पये मिळतात. त्यामुळे नवी करप्रणाली आणायची झाल्यास पालिकेच्या तिजोरीत थेट उत्पन्न देणारी योजना आणावी, असेही शिवसेनेचे म्हणणे आहे. जकात चोरी रोखण्यासाठी गृह खात्यामार्फत कडक कारवाई करावी. पालिका कर्मचाऱ्यांसोबत सशस्त्र पोलीस यंत्रणाही द्यावी, जेणेकरून जकातनाके गुंड प्रवृत्तीपासून मुक्त होतील, असेही सेनेने म्हटले आहे. जकात चोरी रोखल्यामुळे पालिकेच्या तिजोरीत १०० टक्के निधी मिळेल. या संदर्भातील पत्र सुनील प्रभू यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. (प्रतिनिधी)