उमेदवारीसाठी नेत्यांचा वशिला बिनकामाचा

By admin | Published: January 4, 2017 06:05 PM2017-01-04T18:05:59+5:302017-01-04T18:50:14+5:30

आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे

Leaders of the leaders for nomination | उमेदवारीसाठी नेत्यांचा वशिला बिनकामाचा

उमेदवारीसाठी नेत्यांचा वशिला बिनकामाचा

Next

योगेश पांडे/ ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 4 - आगामी महानगरपालिका निवडणूकांच्या तिकीटवाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतींदरम्यान 'मेरिट'च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे नाव तिकीटासाठी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मनपा निवडणूकांत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी शहर कॉंग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्यांमधील आपापसातील वैचारिक मतभेदामुळे पक्षात गट निर्माण झाल्याचे दिसून येत असताना या धोरणाचा कितपत फायदा होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी उमेदवार अंतिम करण्याच्या दिशेने कॉंग्रेसनेदेखील पावले उचलली आहेत. शहरातील ३८ प्रभागांसाठी पक्षाकडे अकराशेहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत.८ जानेवारीपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. याअगोदर कुठे ना कुठे अमूक नेत्याच्या जवळचा उमेदवार किंवा तमूक गटाचा खास या ओळखीवर तिकीट अंतिम व्हायचे. नेत्यांकडून आपल्या उमेदवारासाठी विशेष शिफारसदेखील करण्यात यायची. अशा स्थितीत मुलाखतींना फारसे महत्त्व राहिले नव्हते व यातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण व्हायचा.
यंदाच्या मनपा निवडणूकांत योग्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे निर्देश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले होते. त्यानुसार शहर कॉंग्रेस कमिटीने  'मेरिट'चे धोरण अवलंबवायचे ठरविले. विशिष्ट गट किंवा नेत्याच्या जवळचा उमेदवार आहे, म्हणून तिकीट अंतिम होणार नाही. संबंधित उमेदवाराचे प्रभागातील काम, जनमानसातील प्रतिमा, कार्यकर्त्यांमधील वावर आणि मुलाखतींमधील एकूण कामगिरी या आधारावरच त्याच्या नावाची तिकीटासाठी शिफारस करण्यात येणार आहे. निवड समितीचे अध्यक्ष शहराध्यक्ष राहणार असून समितीत माजी खासदार, आमदार यांच्यासह २२ ते २४ जणांचा समावेश आहे.

Web Title: Leaders of the leaders for nomination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.