पालेभाज्या कडाडल्या, कोथिंबीर ४० रुपये जुडी, पावसामुळे पालेभाज्यांवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:03 AM2017-09-23T00:03:00+5:302017-09-23T00:03:02+5:30

गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत.

Leafy vegetables, cottage cheese 40 bucks, rainfall results due to pheilabhaj | पालेभाज्या कडाडल्या, कोथिंबीर ४० रुपये जुडी, पावसामुळे पालेभाज्यांवर परिणाम

पालेभाज्या कडाडल्या, कोथिंबीर ४० रुपये जुडी, पावसामुळे पालेभाज्यांवर परिणाम

Next

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे मोठ्या प्रमणात पालेभाज्या खराब झाल्या असून, आवकदेखील कमी झाली आहे. यामुळे पालेभाज्यांचे दर कडाडले आहेत. कोथिंबिरीची एक जुडी किरकोळ बाजारात तब्बल ४० ते ४५ रुपयांवर पोहोचली आहे, तर मेथीच्या भाजीची जुडी १५ ते २५ रुपयांनी विक्री केली जात आहे.
पावसाने भिजल्यामुळे ओल्या होत असून दुय्यम दर्जाच्या होत आहेत. आवक होणाºया पालेभाज्यांपैकी तब्बल ६० इतक्या पालेभाज्या खराब आहेत़ गुलटेकडी येथील मार्केट यार्डात पालेभाज्यांची आवकही काही प्रमाणात घटली आहे, मात्र मागणी चांगली असल्याने बाजारात तुटवडा जाणवत आहे़ त्यामुळे भाज्यांच्या भावातही वाढ झाली आहे़ गेले आठवडाभर पाऊस पडत असल्याने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे.़ घाऊक बाजारात कोथिंबिरीची एक जुडी १० ते २० रुपयांना मिळत असून किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपयांनी विक्री होत आहे़ तसेच मेथी घाऊक बाजारात ८ ते १५ रुपयांनी विक्री केली जात आहे. ती किरकोळ बाजारात १५ ते २५ रुपयांपर्यंत विक्री केली जात आहे़ इतर पालेभाज्यांचीही चढ्या दरानेच विक्री होत आहे़

Web Title: Leafy vegetables, cottage cheese 40 bucks, rainfall results due to pheilabhaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.