पालेभाज्या, टोमॅटो कडाडले
By admin | Published: June 30, 2014 10:08 PM2014-06-30T22:08:24+5:302014-06-30T22:08:24+5:30
पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे.
Next
>अवसरी : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस उलटून गेले, मात्र पावसाचा अद्यापर्पयत पत्ता नसल्याने हिरव्या पालेभाज्यांसह तरकारी मालाचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोच्या कॅरेटला 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे.
नारायणगाव येथे टोमॅटो खरेदी-विक्रीची मोठी बाजारपेठ असल्याने या बाजारपेठेत दिल्ली येथील व्यापारी टोमॅटो खरेदीसाठी येतात.
आंबेगाव तालुक्यातील दैनंदिन शंभर ते दीडशे पिकअप गाडय़ा, तीनचाकी अॅपेरिक्षा टोमॅटो घेऊन नारायणगाव येथे बाजारपेठेत टोमॅटो विक्रीसाठी घेऊन जातात. ¨डभे धरणात पाणीसाठा मर्यादित असल्याने शेतक:यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच शेतीचे नियोजन करावे लागत आहे. चालू हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केलेल्या शेतक:यांना सद्य:स्थितीत ब:यापैकी आर्थिक नफा मिळू लागला आहे.
वीस किलो वजनाच्या टोमॅटोच्या एका कॅरेटला सध्या 25क् ते 29क् रुपये असा दर मिळत आहे. शेतक:यांना भांडवली खर्च वजा जाता चांगले उत्पन्न मिळत असल्याने शेतक:यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण
आहे. (वार्ताहर)
4पावसाळा सुरू होऊन दोन नक्षत्रं उलटली. मात्र, वरुणराजा बरसला नाही. परिणामी, शेतक:यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. खरीप हंगामातील पिकांची रुजवण अधिकाधिक लांबत चालल्याने शेतकरी विवंचनेत आहे.
4आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दक्षिणोकडून ¨डभा उजवा कालवा, तर उत्तरेकडून घोड नदी वाहते. ¨डभे धरणात पाणीसाठा मर्यादित असल्याने शेतक:यांना उपलब्ध असलेल्या पाण्यावरच शेतीचे नियोजन करावे लागत आहे. चालू हंगामात टोमॅटो पिकाची लागवड केलेल्या शेतक:यांना सद्य:स्थितीत ब:यापैकी आर्थिक नफा मिळू लागला आहे.
4पाण्याच्या तुटवडय़ामुळे आणि वातावरणातील बदलांमुळे रोगांचा फैलावलेला प्रादुर्भाव यामुळे अनेक शेतीपिके संपुष्टात आली आहेत. अशा परिस्थितीत अनेक शेतक:यांनी टोमॅटोची केलेली बाग वेळेवर औषध फवारणी करून राखले आहेत. या टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळत आहे.