उत्तुंग आकाशात झेप घेणारे ‘उडान’
By admin | Published: July 22, 2016 03:27 AM2016-07-22T03:27:51+5:302016-07-22T03:27:51+5:30
सलाम बॉम्बेतर्फे नुकतेच नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या सभागृहात ‘उडान’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
मुंबई : आर्थिकदृष्ट्या बिकट परिस्थितीतही विद्यार्थ्यांना झेप घेता यावी, यासाठी सलाम बॉम्बेतर्फे नुकतेच नरिमन पॉइंट येथील एनसीपीएच्या सभागृहात ‘उडान’ या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. विशेष म्हणजे या नाटकात शहरातील अनेक झोपडपट्ट्यांमधील मुलांनी सहभाग घेतला होता.
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या मुलांमधील कलागुण ओळखून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम सलाम बॉम्बे ही संस्था करते. या संस्थेच्या माध्यमातून १२ ते १७ वयोगटातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. त्यांच्यातील कलागुण ओळखून ती कला वृद्धिंगत करण्याचे काम सलाम बॉम्बे कला अकादमी करते. या अकादमीतील विद्यार्थ्यांनी ‘उडान’ नाटकाचे सादरीकरण केले. या नाटकाचे दिग्दर्शन १७ वर्षीय आशना जोशी हिने केले. अवघ्या काहीच दिवसांत बसवण्यात आलेल्या नाटकाचे विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण केल्याने उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)