शिक पोरा शिक, आता लढायला शिक...!
By Admin | Published: June 13, 2016 11:18 PM2016-06-13T23:18:08+5:302016-06-13T23:21:55+5:30
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड नशिबी आलेले अठरा विश्व दारिद्रय पेलताना अख्या घरादाराची वाताहात झालेली... दुष्काळाने कुटुंबांतील कर्ता हिरावला... सगळीकडे आभाळच फाटलेले...
आधार गेला : काळजाचा तुकडाही शिक्षणासाठी दुरावला
व्यंकटेश वैष्णव ल्ल बीड
नशिबी आलेले अठरा विश्व दारिद्रय पेलताना अख्या घरादाराची वाताहात झालेली... दुष्काळाने कुटुंबांतील कर्ता हिरावला... सगळीकडे आभाळच फाटलेले... अशा परिस्थितीत काळजाचा तुकडा असलेल्या पोटच्या पोराला देखील शिक्षणाच्या निमित्ताने दुरावण्याचे दु:ख न पेलवणारे, परंतु पोरगं शिकलं तर उद्याचा दिवस सुखकर होईन. या अपेक्षेने ५५ मायमाऊल्यांनी आपल्या काळजाच्या तुकड्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सोमवारी निरोप दिला.
भारतीय जैन संघटनेच्या वतीने बीड जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना बारावी पर्यंतचे मोफत शिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवारी बीड जिल्ह्यातून ५५ मुले बीजेएसच्या पुणे येथील शाळेत रवाना झाले. याप्रसंगी त्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाला अप्पर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे, नाम फाऊंडेशनचे मराठवाडा समन्वयक राजाभाऊ शेळके, हभप भरतबुआ रामदासी, किशोर पगारीया, गौतम खटोड, दादासाहेब मुंडे, शिवराम घोडके, राजेंद्र मुनोत, किशोर पगारीया आदींची उपस्थिती होती.