शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया संथ

By admin | Published: March 13, 2017 04:07 AM2017-03-13T04:07:28+5:302017-03-13T04:07:28+5:30

शिक्षणहक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अधिकृत संकेतस्थळावर सोडत पद्धतीने निवड झालेल्या ३९३ शाळांतील सुमारे ४५७४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी आणि निवड न झालेल्या ३०८४ विद्यार्थ्यांची यादी

Learning Access | शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया संथ

शिक्षणहक्क प्रवेशप्रक्रिया संथ

Next

नाशिक : शिक्षणहक्क प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अधिकृत संकेतस्थळावर सोडत पद्धतीने निवड झालेल्या ३९३ शाळांतील सुमारे ४५७४ विद्यार्थ्यांची शाळानिहाय यादी आणि निवड न झालेल्या ३०८४ विद्यार्थ्यांची यादी संकेत स्थळावरील ‘सिलेक्टेड’ आणि ‘नॉन सिलेक्टेड’ विभागात उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.
नमूद करण्यात आलेल्या शाळांनी बुधवार (दि. १५)पर्यंत कागदपत्रांची योग्य तपासणी करून आॅनलाइन पद्धतीने प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर शाळांना सबळ कारणाने प्रवेश नाकारायचा झाल्यास बुधवार (दि. १५) पर्यंत शाळेने पालकांना योग्य कारण नमूद करून पत्रव्यवहार करणे आवश्यक आहे. याप्रकरणी पालकांनी तक्रार केल्यास गटशिक्षण अधिकारी किंवा प्रशासन अधिकाऱ्यांनी गुरुवार (दि. १६) पर्यंत सुनावणी घेऊन शुक्रवार (दि. १७) पर्यंत आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेत ‘०’ (शून्य) नोंदवणे आवश्यक आहे. असे न केल्यास सोमवारी (दि. २०) घेण्यात येणारी दुसरी प्रवेशफेरी घेता येणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Learning Access

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.