देवळे धरणाला गळती!

By admin | Published: April 26, 2016 03:27 AM2016-04-26T03:27:10+5:302016-04-26T03:27:10+5:30

तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीत देवळे-करंजे लहूळसे रस्त्यालगत देवळे गावच्या वरच्या बाजूस १९८१ मध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत धरण मंजूर झाले

Lease dams dam! | देवळे धरणाला गळती!

देवळे धरणाला गळती!

Next

पोलादपूर : तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीत देवळे-करंजे लहूळसे रस्त्यालगत देवळे गावच्या वरच्या बाजूस १९८१ मध्ये लघु पाटबंधारे विभागामार्फत धरण मंजूर झाले, त्यावेळी ७५ ते ८० लाख रूपये या कामासाठी मंजूर झाले. सुमारे २५ हून अधिक शेतकऱ्यांची जमीन यासाठी संपादित करण्यात आली. या जमीनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम देण्यात आल्या. यामधील काही शेतकरी भूमीहिन झाले. प्रत्यक्षात या धरणाचे काम १९९६ मध्ये चालू करण्यात आले व २००५ पर्यंत ते पूर्णत्वास नेले. तोपर्यंत या धरणासाठी तब्बल ५ कोटी रूपये खर्च करण्यात आले. मात्र या धरणातून गळती होत असल्याने पाणी साठत नाही.
देवळे धरण झाल्यामुळे सुमारे १५० हेक्टर जमीन ओलीत खाली येणार होती. त्यासाठी विठ्ठलवाडीच्या बाजूने कालवा काढण्याचा प्रस्ताव मंजूर होता. मात्र पहिल्याच वर्षी हे धरण जॅकवेलच्या वॉलजवळ गळती होवून मोठयाप्रमाणात पाणी वाहून जाऊ लागले. तसेच हे धरण मातीचे असल्याने मुरूमाची माती वापरली गेली. तसेच धरणाचे पिचींग चांगल्या पध्दतीने झाले नाही. सिमेंटचा वापर चांगल्या पध्दतीने केला गेला नाही. त्यामुळे धरणाच्या बांधातून ठिकठिकाणी गळती झाली. परिणामी डिसेंबर महिन्यात सुध्दा येथे १००० लिटर पाणी नसते.
वेळोवेळी संबंधित खात्याला संपर्क करून सुध्दा व्हॉल्वचे काम अद्याप करण्यात आले नाही. सदर कामाचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविला असल्याचे उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळते. प्रत्येक वर्षी आमसभेत हा प्रश्न गाजतो. मात्र कारवाई शुन्य. ज्या शेतकऱ्यांनी कवडीमोल भावात आपल्या जमीनी दिल्या. मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी आपल्या जमिती दिल्या होत्या.

Web Title: Lease dams dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.