आज बाप्पाला निरोप!
By admin | Published: September 15, 2016 03:44 AM2016-09-15T03:44:30+5:302016-09-15T03:44:30+5:30
गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांसह ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेसह राज्यभरातील यंत्रणा सज्ज झाली आहे
मुंबई : गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका, मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलिसांसह ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेसह राज्यभरातील यंत्रणा सज्ज झाली आहे. गिरगाव, दादर आणि जुहू या मोठ्या चौपाट्यांसह मुंबई महानगर प्रदेशातील प्रमुख विसर्जनस्थळांवर आवश्यक सेवा-सुविधा पुरवण्यात आल्या असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून
पोलिसांचा फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १२ तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. राज्य दहशतवाद विरोधी दल (एटीएस), बॉम्बशोधक व नाशक पथक, शीघ्रकृती दल, फोर्सवन आणि सिव्हिल डिफेन्स तैनात ठेवण्यात आले आहे. वॉच टॉवर, सीसीटीव्ही कॅमेरा व ड्रोनद्वारे शहरावर नजर ठेवली जाणार आहे. वाहतूक सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल ३ हजार ३६ पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गिरगाव, शिवाजी पार्क आणि जुहू चौपाटीसह वांद्रे, पवई येथे उभारण्यात आलेल्या पाच नियंत्रण कक्षांसह टेहळणी मनोऱ्याद्वारे मिरवणुकांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
ठाणे पोलीस आयुक्तालयातील तब्बल २७ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेसह महापालिकेचे सुरक्षारक्षक, अग्निशमन दलाचे जवान, अनिरुद्ध अॅकॅडमी आॅफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेचे ५०० प्रशिक्षित स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
नवी मुंबई येथे ६ डीसीपी, ८ एसीपी, ५९ अधिकारी आणि २१६९ कर्मचारी तैनात करण्यात आले असून, वाशी येथे गणेश विसर्जन मिरवणुकांवर महापालिकेतर्फे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.
मुंबईत ३ हजार ५३६ वाहतूक पोलिसांच्या मदतीला सशस्त्र पोलीस दलाचे १00 जवान
गृहरक्षक दलाचे २५0 जवान
३९0 वाहतूक रक्षक
हॅम रेडिओचे ३५ स्वयंसेवक
४९ रस्ते वाहतुकीस बंद
५५ रस्ते एकदिशा मार्ग
९९ रस्त्यांवर पार्किंगला बंदी
निरीक्षण मनोरे ४४