नाशिक महापौरपदासाठी आज मुंबईत सोडत
By admin | Published: February 3, 2017 02:37 PM2017-02-03T14:37:37+5:302017-02-03T14:37:37+5:30
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अडीच वर्षांच्या कालावधीकरिता आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.३) सकाळी ११ वाजता मुंबईत मंत्रालयात काढण्यात येणार आहे.
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी अडीच वर्षांच्या कालावधीकरिता आरक्षण सोडत शुक्रवारी (दि.३) सकाळी ११ वाजता मुंबईत मंत्रालयात काढण्यात येणार आहे. महापौरपदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांचे या सोडतीकडे लक्ष लागून आहे.
नाशिक महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झालेली असून, शुक्रवारी (दि.३) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. शुक्रवारीच मंत्रालयात राज्यातील २७ महापालिकांच्या महापौरपदासाठी पुढील अडीच वर्षांच्या कालावधीकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. त्यात नाशिकचाही समावेश आहे. सन २०१२ ते १७ या पंचवार्षिक काळात पहिली अडीच वर्षे इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता तर पुढील अडीच वर्षाकरिता खुल्या प्रवर्ग गटासाठी महापौरपद आरक्षित होते. यंदा नेमके आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी होते, याकडे इच्छुकांची नजर लागली आहे.