लेकीवर अत्याचार करणा-या आईच्या प्रियकराला अटक

By admin | Published: April 20, 2015 02:37 AM2015-04-20T02:37:11+5:302015-04-20T02:37:11+5:30

आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी ‘त्या’ प्रियकराला न्यायालयीन कोठडीतून नुकतेच ताब्यात घेतले आहे

Lechy arrested for lynching mother's lover | लेकीवर अत्याचार करणा-या आईच्या प्रियकराला अटक

लेकीवर अत्याचार करणा-या आईच्या प्रियकराला अटक

Next

भार्इंदर : आईच्या प्रियकराने तिच्या बारा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी ‘त्या’ प्रियकराला न्यायालयीन कोठडीतून नुकतेच ताब्यात घेतले आहे. सुमारे ८ महिन्यांपूर्वी लेकीवर डोळ्यांदेखत हा किळसवाणा प्रकार घडला असतानाही तोंड बंद ठेवणाऱ्या ‘त्या’ मातेलाही पोलिसांनी गजाआड केले आहे.
अत्याचारी तरुणाचे नाव ज्ञानेश्वर पवार असून तो घोडबंदर येथील झोपडपट्टीत राहणारा आहे. त्याचे एका ३५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्या महिलेची बारा वर्षीय मुलगी उत्तन येथील एका अनाथालयातील इयत्ता पाचवीत शिकत होती. सुमारे ८ महिन्यांपूर्वी त्या मुलीची आई पवारसोबत अनाथालयात गेली होती. त्या वेळी पवारने त्या मुलीवर तिच्या आईच्या डोळ्यांदेखत अनाथालयातील स्वच्छतागृहात अत्याचार केला होता. पीडित मुलीने घटनेची माहिती काही दिवसांपूर्वीच आपल्या आजीला सांगितली होती. आजीने त्वरित अनाथालयातील प्राचार्यांना त्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी उत्तन सागरी पोलिसांत आई व तिच्या प्रियकराविरोधात बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांनी १३ एप्रिल रोजी पीडित मुलीच्या आईला गजाआड करुन तिच्या प्रियकराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. तिची कसून चौकशी केली असता तिने पवारचे कृत्य पोलिसांना सांगितले. पोलिसांनी पवारचा मागोवा घेतला असता काशिमीरा पोलिसांनी त्याला आॅक्टोबरमध्ये केबलचोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत असताना उत्तन सागरी पोलिसांनी १७ एप्रिल रोजी त्याला ताब्यात घेतले. त्याला १८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला २४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)

Web Title: Lechy arrested for lynching mother's lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.