डावखरे की फाटक? निकाल आज

By admin | Published: June 6, 2016 03:32 AM2016-06-06T03:32:50+5:302016-06-06T03:32:50+5:30

ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी नियोजन भवनमध्ये मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल.

Left gate gate? Results Today | डावखरे की फाटक? निकाल आज

डावखरे की फाटक? निकाल आज

Next

ठाणे : ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या एका जागेसाठी शुक्रवारी झालेल्या मतदानाची सोमवारी नियोजन भवनमध्ये मतमोजणी होईल. सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे वसंत डावखरे आणि शिवसेनेचे रवींद्र फाटक निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत एकूण १०६० पैकी १०५७ मतदारांनी मतदान केले असून डावखरे आपला गड राखतात की फाटक विधिमंडळात प्रवेश करतात, हे या निकालाने स्पष्ट होणार आहे.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात १३ मतदार केंद्रांवरून आणलेल्या मतपेट्यांमधील मतांची मोजणी केली जाणार आहे. उपविभागीय अधिकारी दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतमोजणी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी फरोग मुकादम यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Left gate gate? Results Today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.