डावखरे-प्रधान भिडले
By admin | Published: July 6, 2014 12:40 AM2014-07-06T00:40:09+5:302014-07-06T00:40:09+5:30
मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
Next
ठाणो : ठाण्यात शनिवारी राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे कार्यकत्र्याना आपापसांतील वाद मिटवून एकदिलाने काम करा, असे सांगत असताना दुसरीकडे हा मेळावा संपताच विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे आणि शहराध्यक्ष मनोज प्रधान यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. या मेळाव्यात भाषण करणा:या वक्त्यांच्या यादीतून ऐनवेळी डावखरे यांचे नाव वगळले गेल्याने ते नाराज झाले होते. परंतु, यानिमित्ताने ठाण्यातील राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटय़ावर आला आहे.
डावखरे भाषण करणार नाहीत हे लक्षात येताच प्रथम प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी नाईक, डावखरे, आव्हाड असे ठाणो जिल्ह्यातील गटांचे जे राजकारण चालू आहे, ते बाजूला सारून पक्ष हितासाठी एकत्र येऊन काम करण्याबाबत या सर्वाना कानपिचक्या दिल्या. त्यानंतर, खुद्द अजित पवार यांनीदेखील यापुढे कोणी भाषण करावे, याची यादी स्वत: प्रदेशाध्यक्षांनी तयार करावी, अशी सूचना केली. पण, त्यांचे हे बोलणो मनावर घेतील ते ठाण्यातील राष्ट्रवादीतील नेते कसले. हा मेळावा संपताच अजित पवार पत्रकार परिषदेला जात असताना सभागृहाच्या बाहेरच वसंत डावखरे आणि मनोज प्रधान यांच्यात बाचाबाची झाली. डावखरेंनी प्रधान यांना खडेबोल सुनावले.
हे प्रकरण इतक्यावरच न थांबता त्यानंतर प्रधान यांच्या पत्नीनेही डावखरे पितापुत्रकडे झाल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या वेळी त्यांचे डोळेही पाणावले होते. त्यानंतर, झाल्या प्रकाराबद्दल बोलताना मनोज प्रधान म्हणाले की, हा सर्व प्रकार नजरचुकीने झाला असून, भाषण करणा:या वक्त्यांच्या यादीत डावखरे यांचे नाव होते; पण टायपिंग करताना नजरचुकीने ते नाव वगळले गेले. डावखरे हे वरिष्ठ नेते आहेत. त्यांना आम्हाला रागवण्याचा अधिकार असून आम्ही सर्व एकदिलाने यापुढे काम करू, असे स्पष्टीकरण प्रधान यांनी दिले.
या मेळाव्याला जे वक्ते भाषण करणार होते, त्यांची एक यादी तयार करण्यात आली होती. या यादीत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांचे नावच नव्हते. त्यामुळे ते नाराज झाले आणि त्यांनी आपण भाषणच करणार नसल्याची भूमिका घेतली.