समुद्राच्या लाटांवर रंगली रामकथा

By admin | Published: April 3, 2017 09:36 PM2017-04-03T21:36:02+5:302017-04-03T21:36:02+5:30

समुद्राच्या लाटांवर स्वारहोण्यातील मजा अनोखीच आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक कोकणाची वाट धरतात.

The legend of a sea of ​​tales on sea waves | समुद्राच्या लाटांवर रंगली रामकथा

समुद्राच्या लाटांवर रंगली रामकथा

Next

शिवाजी गोरे / ऑनलाइन लोकमत

रत्नागिरी, दि. 3 - समुद्राच्या लाटांवर स्वारहोण्यातील मजा अनोखीच आहे. याच आकर्षणामुळे दरवर्षी लाखो पर्यटक कोकणाची वाट धरतात. समुद्राच्या ओढीनेच मग कुणी उसळत्या लाटांमध्ये जाऊन विवाहही करतात. आता तर समुद्राच्या या आकर्षणातून रामकथांचा कार्यक्रम दापोलीतील समुद्राच्या लाटांवर साजरा झाला आहे. ‘श्री राम,  जय राम, जय जय राम...’ असा रामनामाचा जप करत अथांग लाटांवर स्वार होत अरबी समुद्राच्या साक्षीने प्रसिद्ध राम कथाकार संत नामदेव महाराज लबाडे यांनी बोटीवर रामकथा रंगवली.

भूतलावर आपण आजपर्यंत अनेक रामकथा ऐकल्या व वाचल्या असतील. मात्र, समुद्रातील पहिली रामकथा ऐकण्याचे भाग्य दापोली तालुक्यातील पाजपंढरीवासीयांना मिळाले. रामजन्माच्या पूर्वसंध्येला पाजपंढरी रामजन्म उत्सव कमिटीने रामकथेचे आयोजन केले होते. जुन्या कुलाबकर मंडळींनी या रामकथेचे आयोजन चक्क समुद्रातील बोटीवर केले होते. त्यामुळे आजची कथा जरा वेगळीच होती.
अरबी समुद्राच्या उसळलेल्या अथांग लाटा. भणाणणारा वारा. अशा वातावरणात बोटीत चक्क रामकथा. भजनाने भक्त मंडळी भारावून गेली होती. नामदेव महाराज लबडे यांनी राम - लक्ष्मण, सीता - केवट यांची कथा अतिशय मार्मिक शब्दात सादर केली. राम कथेतील अनेक प्रसंगाचे दाखले देऊन लबडे महाराजांनी श्रद्धा व निष्कामसेवा याबद्दल सांगितले. प्रभू रामचंद्राबाबत अनेक दाखले देऊन रामचंद्र महान व आदर्श कसे होते. समाजाने प्रभू रामचंद्राच्या जीवनाचा आदर्श घ्यावा. रामाचा १४ वर्षाचा इतिहास व केवट भेट याचे अनेक दाखले देऊन लबडे महाराजांनी सर्व भाविकांना मंत्रमुग्ध केले. आजपर्यंत आपण हजारो रामकथा सादर केल्या आहेत. मात्र आज प्रभू रामचंद्राच्या कृपेने आज आपल्याला अरबी समुद्रात रामकथा सांगण्याचे भाग्य मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमितील ऐतिहासिक किल्ले जवळून पाहता आले. अरबी समुद्रात रामकथा सादर करुन आपण धन्य झालो. आता एकदा हवेत म्हणजे विमानात कथा सादर करुन इच्छा पूर्ण करायची असल्याचे लबडे महाराज म्हणाले.
वादग्रस्त रामजन्मभूमीवर राममंदिर होणारच असा विश्वाससुद्धा त्यांनी व्यक्त केला. अयोध्येत राममंदिर झाले पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. कोकणातील सर्वात मोठा रामजन्म उत्सव व दापोली तालुक्यातील पाजपंढरी गावात होतो. या ठिकाणी पाच दिवस यात्रा असते. रामजन्म उत्सवानिमित्त गेली चार दिवस वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम सुरु आहेत. अरबी समुद्राच्या काठावर असणाºया पाजपंढरी गावातील रामाचे मंदीर सर्वांचे खास आकर्षण आहे.

Web Title: The legend of a sea of ​​tales on sea waves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.